Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपी अँड जी शिक्षा “बेटियां स्कॉलरशिप” अंतर्गत आयआयएम मुंबई मधील तीन विद्यार्थिनींना...

पी अँड जी शिक्षा “बेटियां स्कॉलरशिप” अंतर्गत आयआयएम मुंबई मधील तीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली

 

ही स्कॉलरशिप योजना कंपनीच्या प्रमुख सीएसआर उपक्रम “पी अँड जी शिक्षा” चा भाग आहे. या योजनेद्वारे STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाते.

या उपक्रमातून देशभरातील वंचित समुदायांमधील अनेक हुशार मुलींना पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. गेल्या 21 वर्षांत “पी अँड जी शिक्षा” उपक्रमामुळे 1 कोटी मुलांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

फोटो कॅप्शन: ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया “पी अँड जी शिक्षा बेटियाँ स्कॉलरशिप” द्वारे मुलींचे शिक्षण सुरू राहावे यासाठी प्रेरणा देते आणि प्रयत्न करते. या उपक्रमाद्वारे ‘पी अँड जी शिक्षा’ने 1 कोटी स्वप्नांना साथ देण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

मुंबई, 23 मार्च 2026: एरियल’, ‘टाइड’ आणि ‘जिलेट’ यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे निर्माते असलेल्या ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया (पी अँड जी इंडिया) ने, आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे STEM अभ्यासक्रम शिकणाऱ्या तीन मुलींना “पी अँड जी शिक्षा बेटियाँ स्कॉलरशिप” देऊन सन्मानित केले. हा उपक्रम सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी यांच्या सहकार्याने राबवला जातो. ही स्कॉलरशिप आयआयएम मुंबई इक्वॅलिटी समिटच्या सहाव्या आवृत्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी पी अँड जी इंडियाचे सीईओ वी कुमार, आयआयएमम मुंबईचे संस्थापक संचालक मनोज कुमार तिवारी आणि सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीचे सीईओ अमित चंद्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा सन्मान ‘पी अँड जी शिक्षा’साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमाने 21 वर्षांहून अधिक काळात देशभरातील वंचित समुदायांमधील 1 कोटीहून अधिक मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणली आहे.

प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम पी अँड जी शिक्षाचा एक भाग असलेली “शिक्षा बेटियाँ स्कॉलरशिप” ही एक खास योजना आहे. या योजनेद्वारे वंचित समुदायांतून आलेल्या आणि STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सलग चौथ्या वर्षी ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे. यामुळे तरुण महिलांना नवीन औद्योगिक क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी अधिक संधी मिळत आहेत.

गेल्या काही वर्षांत “पी अँड जी शिक्षा” उपक्रमाने शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध भागीदार आणि स्थानिक समुदायांसोबत काम केले आहे. तळागाळात काम करणाऱ्या संस्थांसोबत दीर्घकालीन भागीदारी करून हा उपक्रम लोकांना पुढे जाण्यास आणि प्रगती करण्यासाठी संधी निर्माण करत आहे.

या प्रसंगी बोलताना, एनाक्षी देवा, हेड – सीएसआर आणि कम्युनिकेशन्स, प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया म्हणाल्या, “पी अँड जी शिक्षा” या उपक्रमाला 21 वर्षे पूर्ण होत असताना, आम्ही फक्त एका आकड्याचा उत्सव साजरा करत नाही, तर 1 कोटी स्वप्नांना दिलेल्या पाठबळाचा आनंद साजरा करत आहोत. आमच्यासाठी सकारात्मक बदल घडवणे हा एकट्याचा प्रवास नसतो. आम्ही समान विचारांच्या आणि प्रभावी संस्थांसोबत भागीदारी करून हे सुनिश्चित करतो की, एखादे मूल कुठून आले आहे यामुळे त्याच्या भविष्यातील संधी कमी होऊ नयेत. पी अँड जी शिक्षा बेटियाँ स्कॉलरशिप हा मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या आमच्या प्रयत्नांपैकी एक आहे. आम्ही ज्या समाजात राहतो आणि काम करतो, त्या समुदायांना साथ देणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत.”

‘पी अँड जी शिक्षा’ उपक्रमाचा सकारात्मक परिणाम या 1 कोटी मुलांपैकी प्रत्येकाच्या आयुष्यात दिसून येतो. अशाच “एक कोटींमधील एकाच्या” प्रेरणादायी प्रवासाची कथा हिमाचल प्रदेशातील एक तरुण विद्यार्थिनी पलक ठाकूर हिची आहे. आर्थिक अडचणींमुळे तिची स्वप्ने मर्यादित झाली होती. सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी यांच्या सहकार्याने मिळालेल्या ‘पी अँड जी शिक्षा बेटियां स्कॉलरशिप’मुळे तिला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. रेल्वेची तयारी करण्याऐवजी तिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि एआय इंजिनिअर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आज ती स्वतः कौशल्ये विकसित करत असून इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करत आहे. तिची ही वाटचाल दाखवते की, एक स्कॉलरशिप केवळ एका व्यक्तीचे आयुष्य बदलत नाही, तर अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकते.

या स्कॉलरशिप्स आयआयएम मुंबई इक्वॅलिटी समिटच्या सहाव्या आवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान देण्यात आल्या. या परिषदेत सरकार, उद्योग (कॉर्पोरेट) आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यांनी विशेषतः सप्लाय चेन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात STEM करिअरमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कसे वाढवता येईल, यावर चर्चा केली.

पी अँड जी शिक्षा बद्दल:

पी अँड जी शिक्षा हा प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम असून, तो 2005 मध्ये सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये मूलभूत वाचन, लेखन आणि गणित कौशल्ये सुधारण्याचा आहे. यासाठी शिक्षणातील उणिवा ओळखून त्यावर उपाय करणे आणि मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यावर विशेष भर दिला जातो. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणा’शी सुसंगत असून, वंचित समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून 1 कोटीहून अधिक मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया बद्दल:

पी अँड जी इंडिया भारतातील ग्राहकांना विश्वासार्ह, दर्जेदार आणि अग्रगण्य ब्रँड्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देते. यामध्ये विक्स, एरियल, टाइड, व्हिस्पर, ओले, जिलेट, व्हीनस, अँबीपुर, पॅम्पर, पॅन्टीन, ओरल-बी, हेड अँड शोल्डर्स, हर्बल एसेन्सेस, ब्रॉन आणि ओल्ड स्पाइस यांसारखे ब्रँड्स समाविष्ट आहेत. पी अँड जी इंडिया आणि त्यांच्या ब्रँड्सबद्दल अधिक माहितीसाठी in.pg.com या वेबसाइटला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments