मुंबई, भारत – 27 मार्च 2026: अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज फिटनेस शो फेमसली फिट हा एक पूर्णपणे नवीन साप्ताहिक फिटनेस आणि जीवनशैली शो प्रदर्शित केला. सोफी चौधरी ने सूत्रसंचालन केलेल्या या सहा एपिसोडच्या सिरीजमध्ये तंदुरुस्ती, प्रसिद्धी आणि स्पष्ट संभाषण निराळीच उंची गाठणार. ज्यामुळे प्रेक्षकांना भारतातील काही सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींमागील दिनचर्या आणि कथांवर एक अनफ़िल्टर्ड दृष्टीकोन मिळतो.
प्रत्येक भागामध्ये एक ए-लिस्ट सेलिब्रिटी रेड कार्पेटपासून दूर जाऊन एका वर्कआऊट सेटअपमध्ये पाऊल ठेवतो. या सिरीजची सुरुवात आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक, क्रिती सॅनन, त्यानंतर फिटनेस आयकॉन आणि सदाबहार मलायका अरोरा तसेच प्रचंड लोकप्रिय आणि कायम प्रेक्षक पसंतीस उतरलेली सोनम बाजवा यांच्याद्वारे होते. या श्रेणीमध्ये गझल अलघ (सह-संस्थापक, होनासा कन्झ्युमर लिमिटेड) यांचाही समावेश असून आणखी काही रोमांचक नावे लवकरच या श्रेणीत दाखल होणार आहेत. योग आणि सामर्थ्य प्रशिक्षणापासून ते कार्यात्मक तंदुरुस्तीपर्यंत, प्रेक्षकांना प्रामाणिक दिनचर्या, वैयक्तिक शिस्त आणि लोकांच्या नजरेत तंदुरुस्त राहण्याची वास्तविकता जवळून उपलब्ध होते. ‘फेमसली फिट’ ख्यातनाम व्यक्तींच्या स्पष्ट अंतर्दृष्टीचा वापर करते, सामान्य तंदुरुस्तीभोवती असलेल्या दंतकथांचे खंडन करते आणि त्यांचे अधूनमधून होणारे चॅट किंवा शॉर्टकट देखील उघड करते. ज्यामुळे सिरीज अत्यंत संबंधित आणि शेअर करण्यायोग्य बनते.
अॅमेझॉन अॅड्सचे डायरेक्टर गुलशन वर्मा पुढे म्हणाले, “’फेमसली फिट’ प्रेक्षकांना तंदुरुस्तीच्या वास्तविक बाजूच्या जवळ आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जिथे सेलिब्रिटी दिनचर्या दैनंदिन शिस्तीत पूर्ण करतात. या सिरीजची मांडणी अस्सल असल्याने प्रत्येक क्षण अनस्क्रिप्टेड ठेवून, हा शो अधिक संबंधित आणि आकर्षक पाहण्याचा अनुभव निर्माण करतो. त्याच वेळी, अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर प्रेक्षक खऱ्या अर्थाने ज्या कंटेंटशी जोडले जातात. त्यामध्ये ब्रँडला कथेचा भाग बनण्याचा एक नैसर्गिक मार्ग मिळतो.”
आपला उत्साह व्यक्त करताना, सोफी चौधरी म्हणाली, “तंदुरुस्ती हा कायमच माझ्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि ‘फेमसली फिट’ चे सूत्रसंचालन हा त्याचा नैसर्गिक विस्तार असल्यासारखे वाटले. मला या शो’बद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे तो अतिशय वास्तविक आणि अनफिल्टर्ड आहे. यामध्ये केवळ व्यायामाबद्दलची चर्चा नाही नसून त्यामागील शिस्त आणि मानसिकता समजून घेण्याबद्दल प्रयत्न आहे. प्रत्येक सेलिब्रिटी त्यांच्या तंदुरुस्तीच्या प्रवासाला स्वतःच्या अनोख्या पद्धतीने कसे पाहतो हे पाहणे आश्चर्यकारकपणे प्रेरणादायी आहे. बरीच स्पष्टता, गोंधळ आणि मजा आहे. प्रेक्षक कधी एकदा अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर हा शो पाहतात, असे झाले आहे.”
तम्घा एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि सीईओ दमयंत सिंग खनोरिया पुढे म्हणाले, “जगाच्या तुलनेत भारत सर्वात वेगाने फिटनेस प्रेक्षक वाढत आहेत. प्रेक्षकांना स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी आकांक्षादायी वाटल्या तरी आपल्याशा वाटल्या पाहिजे. तामघामध्ये आम्हाला हे अंतर जाणवले आणि ते कमीत-कमी करण्यावर आमचा भर आहे. ‘फेमसली फिट विथ सोफी’ एका विश्वासावर आधारित आहेः की तंदुरुस्तीतील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे आपण पाहत असलेले परिवर्तन नसून प्रामाणिक, अनाकलनीय क्षण आहेत; जे आपल्याला दिसत नाहीत. आम्ही सोफीसह, एक असा मंच घडवला आहे, जिथे वास्तविक व्यायाम ढोंगीपणा उतरवतो. इथे सेलेब्रिटीमधील संभाषण मित्रवत दाखवले आहे. आम्हाला अॅमेझॉन एमएक्ससोबत भागीदारी करण्याचा अभिमान वाटतो. जेणेकरून प्रेक्षकांसमोर केवळ प्रेरित करणारा नव्हे तर त्यांना जोडणारा आणि होय, हसवणारा कार्यक्रम आणायचा होता.”
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने (एएमएक्सपी) तामघा एंटरटेनमेंटद्वारे निर्मित आणि प्रायोजक ओझीवा, एथर, अमेरिकन पिस्ताचियो आणि एन्वे यांच्या भागीदारीत फेमसली फिट’ची निर्मिती केली आहे. हा शोचा पहिला भाग आज अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य स्ट्रीम होईल त्यानंतरचे भाग दर आठवड्याला उपलब्ध होतील ज्यात मोबाइल डिव्हाइस, कनेक्टेड टीव्ही, ऍमेझॉनचे शॉपिंग अॅप, प्राईम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमवर उपलब्ध असलेले भाग प्रेक्षकांना घाम गाळण्यासाठी, स्नायू ताणण्याकरिता आणि स्ट्रिमिंगसाठी आमंत्रित
करतात.


