सन १९९२ मध्ये पुणे शहरातच हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून क्रीडा भारती या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुण्यातील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, क्रीडा शिक्षक व अन्य मान्यवर नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा नेहरू स्टेडियम येथील क्रीडा भारतीचे कार्यालय, के ब्लॉक, दादावाडी जैन मंदिरासमोरील गेट पुणे येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे. या मेळाव्यास पुण्यातील अनेक ऑलिंपिक पटू, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, संघटक, प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.


