Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ------व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गी AVSM ------अखिल...

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ——व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गी AVSM ——अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद व सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय वानवडी पुणे यांच्या समन्वयाने द्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ८१ जणांचे रक्तदान.

पुणे

( प्रतिनिधी )

“मानवी जीवनात अनेक गोष्टींचे महत्व आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन.जीवन वाचविण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत करावी लागते. रक्तदान हे त्यातलेच एक आदर्श उदाहरण आहे. रक्तदान हे आपल्या सृष्टीतील एक अद्वितीय योगदान आहे आणि म्हणूनच रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे” असे प्रतिपादन व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी कमांडंट राष्ट्रीय संरक्षण अकादमी यांनी केले. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद व सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय वानवडी पुणे यांच्या समन्वयाने २८ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए ) मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये व्हाइस ॲडमिरल जग्गी यांनी आपले विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,”आपले रक्त,आपली सेवा,आपली मानवता यांचा एक अद्वितीय संगम असतो. प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने रक्तदान करायला हवे, रक्तदानाची प्रक्रिया खूप सोपी आहे.निर्धारित ठिकाणी जसे रक्तदान शिबिर ठिकाणी, मान्यताप्राप्त रक्तपेढी मध्ये जाऊन तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान करता येते.रक्तदानानंतर शरीरातील रक्ताची कमी झालेली मात्रा काहीच काळात भरून निघते त्यामुळे रक्तदान करणे हे आरोग्यासाठी देखील फायद्याचे ठरते.” आपले विधान सिद्ध करण्यासाठी आणि पुढाकार घेऊन नेतृत्व करण्यासाठी,त्यांनी या शिबिरात सर्वात आधी रक्तदान केले.खडकवासला येथील एन.डी.ए मधील लष्करी रुग्णालय येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये ८१ जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.

या प्रसंगी एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा VM डेप्युटी कमांडंट आणि तसेच इतर अनेक अधिकारी आणि सैनिकांनीही सक्रियपणे सहभाग घेतला. रक्तदान शिबिराचे समन्वयक प्रणल देखणे,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त),उपाध्यक्ष एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त),एअर कमोडर शैलेंद्र घारपुरे (निवृत्त),कर्नल उत्तम पाटील (निवृत्त),ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर (निवृत्त) तसेच “आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज”चे डॉक्टर्स आणि प्रशिक्षणार्थी यांची मुख्य उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून हे रक्तदान शिबिर आयोजिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments