Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedद एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे ‘विस्मृत वीरांगना’ पुस्तक प्रकाशन १९ एप्रिल रोजी

द एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे ‘विस्मृत वीरांगना’ पुस्तक प्रकाशन १९ एप्रिल रोजी

पुणे, १६ एप्रिल ः द एम्पॉवर हर फाउंडेशन यांच्या वतिने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्ःमय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने गौरविलेल्या लेखिका स्व. सुजाताबाई भागवत लिखित ‘विस्मृत वीरांगना’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी १९ एप्रिल रोजी १०.३० वा. क्लब हाऊस डेक्कन जिमखाना क्लब येथे करण्यात येणार आहे. इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते या पुस्तकाचे होणार आहे. अशी माहिती द एम्पॉवर हर फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त संदीप नूलकर यांनी दिली आहे.
या प्रसंगी ‘अनुबाई घोडपडे आणि राणी दीपाबाई आणि आजची पिढी’ या विषयावर राजा दिक्षित भाषण करतील. आयोजित कार्याक्रमाचे निवेदन डॉ. अनघा भट बेहरे करतील.
इतिहासाच्या पडदयाआड गेलेल्या दोन विलंक्षण स्त्रिया अनुबाई घोरपडे आणि राणी दीपाबाई आहेत. यांची जिद्द, धैर्य व संघर्षाची गाथा प्रभावीपणे आपल्या समोर मांडतील. विस्मृतीची धूळ झटकून ह्या पुस्तकाद्वारे नव्याने या वीरांगना नक्कीच नव्या पिढीच्या मनात पुन्हा एकदा आत्मविश्वास आणि स्वाभिमानी ज्योत प्रज्वलित करतील.
शिक्षण कौशल्य विकास व सातत्यपूर्ण मार्गदर्शनातून समजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना स्वतःच्या पयावर उभे करण्याचे काम करत असलेल्या द एम्पॉवर हर फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

द एम्पॉवर हर फाउंडेशन

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments