Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेत्या रविवारी भगवान परशुराम जन्मोत्सवनिमित्ताने दुचाकी फेरीचे आयोजन*

येत्या रविवारी भगवान परशुराम जन्मोत्सवनिमित्ताने दुचाकी फेरीचे आयोजन*

 

पुणे, दि. १७ – पुणे शहरातील विविध ब्राह्मण संघटना, संस्था एकत्रितपणे “सकल ब्राह्मण समाज” नावाने दरवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सवाचे कार्यक्रम घेत असतात. यावर्षी सर्व हिंदू समाजाला सोबत घेत रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शनिवारवाडा येथून दुचाकी फेरीचा प्रारंभ होऊन सांगता केसरीवाडा येथे होणार असल्याचे सकल ब्राह्मण समाज संघटनेचे प्रमुख विश्वजीत देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, विश्वनाथ भालेराव, राजेंद्र कुलकर्णी व मनोज तारे यांनी आज येथे सांगितले. यावेळी दुचाकी फेरीचा शुभारंभ पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

 

सकाळी ८.३० वाजता सुरुवातीला कसबा गणपती मंदिरात आरती करुन त्यानंतर लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना अभिवादन करून त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष दुचाकी फेरीची सुरुवात शनिवारवाडा येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला हार घालून केली जाणार आहे. त्यापुढे जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, पुढे डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा, पुढे अलका टॉकीज चौकात न. चिं. केळकर व सेनापती बापट पुतळा, पुढे शास्त्रीरोडवरुन सारसबाग कॉर्नर येथे स्वा. सावरकर पुतळा, पुढे सारसबागेसमोरील अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे, पुढे बाजीराव रोडवरील सार्वजनिक काका पुतळा व त्यानंतर शेवटी केसरीवाडा येथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दुचाकी फेरीची सांगता होईल.

———-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments