Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान केंद्रांकडे साहित्य व कर्मचारी रवाना; नव्या नियोजनानुसार थेट केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था* 

मतदान केंद्रांकडे साहित्य व कर्मचारी रवाना; नव्या नियोजनानुसार थेट केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था* 

 

 

*बारामती, दि. २२ :* बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. २३) मतदान होणार असून, त्यासाठी आवश्यक मतदान साहित्य व कर्मचारी आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी, बारामती येथून ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.

या अंतर्गत ४७८ मतदान केंद्रांसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स तसेच ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आली.

 

यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले की, यापूर्वीप्रमाणे मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट त्यांच्या संबंधित मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम यंत्रांसह लिफाफे, फॉर्म्स आणि इतर आवश्यक साहित्य थेट मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

यासाठी संपूर्ण मतदारसंघ ६० झोनमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक झोनसाठी एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. एकूण ६० क्षेत्रीय अधिकारी असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे सुमारे ८ ते १० मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंटेनरची व्यवस्था करून त्याद्वारे ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक केली जात आहे.

मतदानासाठी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही, त्यांच्यासाठी ये-जा करण्यासाठी ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments