Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षणात भारतीय विचारांच्या 'मंथना'ची नितांत गरज : प्रफुल्ल केतकर* पुण्यात ‘संघ शताब्दी...

शिक्षणात भारतीय विचारांच्या ‘मंथना’ची नितांत गरज : प्रफुल्ल केतकर* पुण्यात ‘संघ शताब्दी मंथन’

पुणे : संघाविषयी आजवर अनेक नॅरेटिव्ह पसरवले गेले, मात्र संघ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष शाखेत येणे हाच एकमेव मार्ग आहे. संघाने संपूर्ण समाजालाच संघटित करण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात भारतीय विचारांचे मंथन होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यापीठ भागतर्फे आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ या संवाद सत्रात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. बीएमसीसी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच कार्यक्रम झाला.
केतकर पुढे म्हणाले की, डॉ. हेडगेवारांनी कोणत्याही पद किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ समाजहितासाठी संघकार्याची मुहूर्तमेढ रोवली. ब्रिटिशांनी भारतीय व्यवस्था समजून घेण्यासाठी ५० वर्षे ग्रंथांचा अभ्यास केला, मात्र आपण आपल्याच गौरवशाली इतिहासापासून दूर गेलो आहोत. हे अंतर भरून काढण्यासाठी भारतीय विचार आणि शिक्षण पद्धतीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
डेक्कन महाविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी यांनी ‘पंच परिवर्तना’वर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शताब्दी वर्षात कुटुंब प्रबोधन, समरसता,संवाद, नागरी कर्तव्य आणि पर्यावरण रक्षण या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पृथ्वी ही आपली माता आहे, तिचे शोषण न करता दोहन करणे ही आपली संस्कृती आहे. निसर्गपूजन हा आपला संस्कार असून, तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘संघ दर्शन’ या लघुपटाने झाली. प्रा. विठ्ठल हिवराळे यांनी प्रास्ताविकातून संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला, तर डॉ. गणेश पठारे यांनी सत्राची रूपरेषा मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments