Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सने कात्रज, पुणे येथे नवीन शाखा उघडून महाराष्ट्रातील आपले...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सने कात्रज, पुणे येथे नवीन शाखा उघडून महाराष्ट्रातील आपले स्थान अधिक बळकट केले

नव्या शाखेच्या शुभारंभाच्या निमित्ताने ऑफर: शून्य लॉगिन फी आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांना तात्काळ मंजुरी

पुणे, महाराष्ट्र २७ एप्रिल २०२६: आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी आणि गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीची वित्त पुरवठादार कंपनी असलेल्या आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (ABHFL) आपल्या देशव्यापी वितरण जाळ्याचा विस्तार करण्याच्या योजनेचा भाग म्हणून कात्रजमध्ये नवीन शाखा सुरू केली आहे. या नवीन शाखेसह, महाराष्ट्रातील आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या शाखांची एकूण संख्या आता ३० झाली आहे. यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील कंपनीची पकड अधिक घट्ट झाली असून ग्राहकांना सेवा मिळवणे अधिक सोपे झाले आहे.

उत्तम कनेक्टिविटी आणि वेगवेगळ्या निवासी प्रकल्पांच्या वाढत्या संख्येमुळे कात्रजमध्ये घरांची मागणी खूप जास्त आहे. हे ठिकाण पहिल्यांदाच घर घेणारे ग्राहक आणि नोकरीपेशा व्यावसायिकांना आकर्षित करत आहे. ही नवीन शाखा सुलभ आणि स्थानिक गरजांनुसार गृहनिर्माण वित्त पर्याय उपलब्ध करून देऊन या वाढत्या मागणीची पूर्तता करेल.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विविध ग्राहक वर्गांसाठी तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त उपायांची सर्वसमावेशक श्रेणी प्रस्तुत करते. यामध्ये परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, बांधकामासाठी वित्तपुरवठा आणि मालमत्तेवर कर्ज यांचा समावेश आहे. हे उपाय पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, बिगर-व्यावसायिक स्वयंरोजगार आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण होतात. आपल्या मजबूत डिजिटल यंत्रणेच्या जोरावर, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या ग्राहकांना सुलभ नोंदणी, जलद मंजुरी आणि वाढीव पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना एक उत्तम अनुभव मिळण्याची खात्री मिळते.

या शुभारंभाचे औचित्य साधून, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ग्राहकांना शून्य लॉगिन फी आणि ₹५० लाखांपर्यंत कर्जाना तात्काळ मंजुरी ही खास ऑफर देत आहे. ही ऑफर २७ एप्रिल ते ३१ मे २०२६ पर्यंत वैध असून, यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे सोपे होणार आहे.

विस्ताराबाबत बोलताना आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र ही आमच्यासाठी विकासाची एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. वाढती मागणी आणि लोकांच्या वाढत्या आकांक्षा लक्षात घेता, ग्राहकांशी असलेला आमचा संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमचा प्रादेशिक विस्तार वाढवत आहोत. आमचे विस्तारत चाललेले वितरण जाळे आणि आमची मजबूत डिजिटल क्षमता यांची सांगड घालून, ग्राहकांसाठी घर घेण्याचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि त्रासमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

हॅप्पी होम लोन जर्नी’ (आनंदी गृहकर्ज प्रवास) प्रदान करण्याची आपली बांधिलकी कायम राखत, आदित्य बिर्ला होम फायनान्स लिमिटेड आपल्या या विस्तारातून ग्राहकांचे हित, सुरक्षित कर्ज प्रक्रिया आणि विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून सर्वांना आर्थिक प्रवाहात सामील करून घेण्यावर आपला विश्वास व्यक्त करत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: https://abhfbranches.adityabirlacapital.com/aditya-birla-housing-finance-ltd-katraj-dehu-rd-bypass-loan-agency-ambegaon-budruk-pune-12391611/home

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments