Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिहिलेंटचा nSEPIA बीटा प्लॅटफॉर्म लॉन्च; भावनिक स्थिती समजून ती सुधारण्यासाठी मदत करणारा...

निहिलेंटचा nSEPIA बीटा प्लॅटफॉर्म लॉन्च; भावनिक स्थिती समजून ती सुधारण्यासाठी मदत करणारा जगातील पहिला इमोशनल वेलनेस प्लॅटफॉर्म

nSEPIA बीटा पहिल्या टप्प्यात मार्केट टेस्टिंगसाठी सुरू करण्यात आला आहे.
या प्लॅटफॉर्ममध्ये भावना मोजणे, त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन देणे आणि त्या मार्गदर्शनाचे परिणाम तपासणे या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
पुणे – 29/04/2026: निहिलेंटने nSEPIA बीटा नावाचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हा जगातील पहिला इमोशन वेलनेस प्लॅटफॉर्म असून, तो व्यक्तीच्या भावनिक स्थितीचे मोजमाप करून काही मिनिटांत ती सुधारण्यासाठी वैयक्तिक उपाय सुचवतो. सध्या हा प्लॅटफॉर्म मार्केट टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे.
nSEPIA च्या खासगी बीटा लाँचचा उद्घाटन सोहळा श्री. किरण देशपांडे (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर, सेमीएक्स आयआयटी बॉम्बे आणि बोर्ड मेंबर, ट्रीज फाउंडेशन) यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आला. या सोहळ्याने भावनिक आरोग्य क्षेत्रातील एका बदल घडवणाऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात “फाउंडिंग सर्कल” नावाचा पहिला गटही तयार करण्यात आला. या गटातील निवडक सहभागी प्लॅटफॉर्म वापरणार असून, त्याच्या पुढील विकासातही मदत करणार आहेत.
nSEPIA हा “क्लोज्ड लूप” पद्धतीने काम करणारा प्लॅटफॉर्म आहे. यामागचा उद्देश असा आहे की भावनिक आरोग्य प्रत्येकाला सहज समजावे, वापरता यावे आणि गरजेनुसार उपलब्ध असावे. हा प्लॅटफॉर्म भावनिक आरोग्याला एक ठराविक रचना आणि मोजता येईल असा आधार देतो. तो आधी जलद स्कॅन करून वापरकर्त्याची भावनिक स्थिती ओळखतो. त्यानंतर त्या स्थितीनुसार योग्य उपाय सुचवतो. शेवटी पुन्हा स्कॅन करून त्या उपायांचा परिणाम काय झाला ते दाखवतो. यामुळे फक्त अंदाज किंवा वैयक्तिक मतांवर अवलंबून राहण्याऐवजी, भावनिक आरोग्याबद्दल अधिक स्पष्ट आणि मोजता येणारी माहिती मिळते.
आजच्या काळात ताण, चिंता, थकवा आणि मानसिक दडपण हे दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. अशा वेळी nSEPIA हा एक उपयोगी उपाय ठरतो. शारीरिक आरोग्य जसे काही ठराविक मोजमापांद्वारे तपासले जाते, तसे भावनिक आरोग्य मात्र अनेकदा व्यक्तीच्या सांगण्यावर, भावना व्यक्त करण्यावर किंवा साध्या वेलनेस माहितीवर अवलंबून असते. nSEPIA हे चित्र बदलण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यांच्या भावनिक स्थितीला सोप्या पद्धतीने समजून घेण्यास, तिचा नियमित मागोवा ठेवण्यास आणि ती सुधारण्यासाठी मदत करतो.
हा प्लॅटफॉर्म 30 सेकंदांच्या जलद स्कॅनने सुरू होतो, जो व्यक्तीची भावनिक स्थिती लगेच ओळखतो. हा स्कॅन इमोस्केप या क्लिनिकली तपासलेल्या इमोशन एआय इंजिनवर आधारित आहे. हे इंजिन भावना ओळखताना व्यक्तीचे हावभाव, भाषा किंवा संस्कृती यावर अवलंबून राहत नाही. त्यामुळे वापरकर्त्याला तो प्रत्यक्षात कसा/कशी वाटत आहे याचे अधिक अचूक माहिती मिळते. यानंतर वापरकर्त्याला त्याच्या भावनिक स्थितीचे दृश्य रूप “इमोशन ऑर्ब’च्या स्वरूपात दाखवले जाते. तसेच त्या स्थितीचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण आणि त्यानुसार निरीक्षणावर आधारित मार्गदर्शन दिले जाते.
या प्लॅटफॉर्मचा मुख्य भाग इमोस्केप इंजिन आहे. हे एआयवर आधारित सिस्टम असून, चेहऱ्यावर दिसणाऱ्या सूक्ष्म हालचालींवरून व्यक्तीची भावनिक स्थिती लगेच ओळखते. हे भावना ओळखताना हावभाव किंवा भाषेवर अवलंबून राहत नाही. याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना ते खरोखर काय अनुभवत आहेत हे समजण्यास मदत करणे आणि त्या भावनांसोबत अधिक चांगल्या पद्धतीने काम करणे.
ओळखलेल्या भावनिक स्थितीनुसार nSEPIA वापरकर्त्यांना संगीत, श्वसन व्यायाम, योग आणि ध्यान यांसारखे विज्ञानावर आधारित उपाय सुचवते. हे सर्वसाधारण वेलनेस सल्ले नसून, प्रत्येक व्यक्तीच्या त्या वेळच्या भावनिक स्थितीनुसार निवडलेले उपाय असतात. या प्लॅटफॉर्ममध्ये इमोशन स्केल, प्रगतीचा मागोवा घेण्याची सुविधा आणि पुन्हा स्कॅन करण्याचा पर्यायही आहे. त्यामुळे उपाय केल्यानंतर भावनिक स्थितीत काही बदल झाला आहे का हे वापरकर्त्यांना सहज समजते.
भावनिक स्पष्टता, वैयक्तिक उपाय आणि मोजता येणारे परिणाम या तिन्ही गोष्टींचा एकत्रित अनुभव nSEPIA चे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो इतर वेलनेस प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळा ठरतो. हे फक्त मेडिटेशन अॅप किंवा थेरपीचा पर्याय नाही. nSEPIA एक नवीन प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, जो भावना मोजणे, त्यानुसार वैयक्तिक उपाय देणे आणि त्याचे परिणाम तपासणे हे सर्व एका प्रणालीत एकत्र करतो.
या बीटा लॉन्चमुळे निहिलेंटला nSEPIA प्रत्यक्ष बाजारात तपासण्याची संधी मिळेल. वापरकर्ते हा प्लॅटफॉर्म कसा वापरतात, त्यावर कशी प्रतिक्रिया देतात याचा अभ्यास केला जाईल आणि त्यातून मिळालेला फीडबॅक पुढील विकासासाठी उपयोगी ठरेल. या टप्प्यात वापरकर्त्यांचे वर्तन, त्यांना कोणते उपाय जास्त आवडतात आणि असा प्लॅटफॉर्म रोजच्या भावनिक आरोग्यात कसा उपयोगी पडू शकतो याबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल.
लॉन्चवेळी बोलताना निहिलेंटचे फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. एल. सी. सिंह म्हणाले, “आज तंत्रज्ञानामुळे बाहेरच्या अनेक गोष्टी मोजता येतात, पण आपल्या भावना अजूनही नीट मोजता येत नाहीत. nSEPIA हा त्यात बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. nSEPIA बीटा हे भावनिक आरोग्याकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग बाजारात आणण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे. भावनिक आरोग्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो, पण ते मोजणे आणि त्यावर कृती करणे हे अजूनही व्यवस्थित पद्धतीने होत नाही. nSEPIA हेच अंतर भरून काढण्यासाठी तयार केले आहे. हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना त्यांच्या भावनिक स्थितीला अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास, त्यानुसार योग्य उपाय करण्यास आणि वेळेनुसार त्यातील बदल पाहण्यास मदत करतो. आता बीटा आवृत्ती बाजार चाचणीसाठी उपलब्ध असल्याने, हा प्लॅटफॉर्म प्रत्यक्ष वापरात कसा उपयोगी ठरतो हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे.”
nSEPIA बीटा लॉन्चसह, निहिलेंटने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे स्पष्टता, योग्य प्रतिसाद आणि मोजता येणारी प्रगती यावर आधारित हा प्लॅटफॉर्म सुरुवातीला बाजारात आणला गेला आहे. तसेच, भावनिक आरोग्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोनही यातून समोर येत आहे.
निहिलेंट बद्दल
निहिलेंट ही एक जागतिक स्तरावरील कन्सल्टिंग, प्रॉडक्ट्स आणि सोल्यूशन्स कंपनी आहे. ही कंपनी व्यवसाय परिवर्तन, डिजिटल इनोव्हेशन, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि तंत्रज्ञान उपायांमध्ये विशेष काम करते. 2000 साली स्थापन झालेली ही कंपनी अनेक देशांमध्ये कार्यरत असून व्यवसायांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच आणि ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी मदत करते. nSEPIA निहिलेंटचा एक महत्त्वाचा भावनिक वेलनेस प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे तंत्रज्ञान, मानवी वर्तन आणि पारंपरिक ज्ञान यांचा एकत्र वापर करून नवीन आणि वेगळे उपाय तयार करण्यावर कंपनीचा भर दिसून येतो.

Home

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments