पुणे : ‘ऑटिझम केअर अँड डेव्हलपमेंट सेंटर’ या प्रकल्पातून पुण्यात विशेष मुलांसाठी शिक्षण व निवासी सुविधा असलेले केंद्र उभारण्याची संकल्पना… पारंपरिक शिक्षणपद्धतीला पर्याय देणाऱ्या शाळा… अकोले तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरण… कृषीसेतू… सहजीवनाच्या संकल्पनेवर आधारित वास्तुरचना… हेरिटेज लिंक, वाई असे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प ‘एक्झिट २०२६’ या वास्तु प्रकल्प प्रदर्शनात विद्यार्थ्यानी सादर केले.
विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने फायनल थेसिस ज्युरी २०२६ आणि ‘एक्झिट २०२६’ या विद्यार्थ्यांच्या वास्तु प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पिरंगुट येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात हे प्रदर्शन पार पडले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी पुणे व मुंबई येथील १२ नामांकित वास्तुरचनाकारांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प परीक्षकांसमोर सादर केले. कार्यक्रमात कॉलेज चे प्राध्यापक अणि विद्यार्थी उपस्थित होते.
‘एक्झिट २०२६’ प्रदर्शनामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील निवडक कामे क्युरेटेड पॅनेल्सच्या माध्यमातून सादर केली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनेक प्रख्यात वास्तुविशारदांच्या कार्यालयांनी भेट दिली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची त्यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी निवड करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मौल्यवान अनुभव आणि शिकण्याची उत्तम संधी मिळाली.


