धोरणात्मक भागीदारीमध्ये गिगावॅट-पातळीचे डेटा सेंटर उभारण्यासाठी एअरटेलचे नेक्सट्रा अग्रणी आहे, ज्यातून राष्ट्रीय डिजिटल पायभूत सुविधांमध्ये एका महत्वपूर्ण टप्प्याची सुरवात होत आहे.
विशाखापटनम, भारत – एप्रिल 29, 2026 — आज गुगलने विशाखापटनम (विजग), आंध्र प्रदेश येथे आपल्या महत्वपूर्ण AI हबचे उद्घाटन केले — जी आजपर्यंत कंपनीद्वारे भारतामध्ये केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अदानीकनेक्स सह एअरटेल यांचे नेक्स्ट्रा या गिगावॅट-स्तरीय परिसंस्थेची उभारणी करण्यात अग्रगण्य राहाणार आहेत, ज्यासाठी नेक्स्ट्राच्या सर्वोत्तम दर्जाचे डेटा सेंटर्स, संपूर्ण भारतात उपलब्ध असलेले अल्ट्रा-लो-लेटन्सीचे फायबर, हरित उर्जा, आणि अत्याधुनिक केबल लँडिंग स्टेशनचा वापर केला जाईल ज्यामुळे भारताच्या आर्थिक आणि पर्यावरणीय लवचिकतेसाठी गुगलची कटिबद्धता अधिक मजबूत होईल.
तर्लुवाडा समारंभामध्ये उपस्थित असलेले मान्यवर: श्री. अश्विनी वैष्णव, (रेल्वे, I&B, इलेक्ट्रॉनिक्स आणि ITचे केंद्रिय मंत्री); श्री. नारा चंद्राबाबु नायडू (AP मुख्यमंत्री); श्री नारा लोकेश (AP IT मंत्रीमहोदय); श्री. बिकाश कोले (गुगल क्लाउड VP); श्री. करण आणि जीत अदानी (अदानी समूहाचे संचालक); श्री. राकेश मित्तल (भारती एन्टरप्रायजेसचे व्हाइस चेअरमन).
समारंभाबद्दल बोलताना श्री. गोपाल विठ्ठल, भारती एअरटेलचे एक्झिक्युटीविह व्हाइस चेअरमन, म्हणाले:
“हे महत्वपूर्ण AI केंद्र उभारण्यासाठी गुगल आणि अदानी यांच्यासह आमच्या धोरणात्मक भागीदारीद्वारे, आम्हाला भारताची डिजिटल महत्वाकांक्षा अधिक प्रगत करण्यात मदत होणार आहे. जागतिक AI नकाशावर एक नवीन केंद्र म्हणून उदयास येणाऱ्या विशाखापटनमसह, आम्ही सुनिश्चिती करू की भारत केवळ आपल्या लोकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रगतीचा वेग निश्चित करेल. आमच्या सर्वोत्तम दर्जाच्या डेटा सेंटर्सचा संपूर्ण संच, हरित उर्जेचा वापर, पूर्ण भारतात उपलब्ध असलेले अल्ट्रा-लो-लेटन्सी फायबर, आणि अत्याधुनविक केबल लँडिंग स्टेशन विजग मध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाची AI पायाभूत सुविधा उभारण्यास सक्षमता देईल.”
श्री. अश्विनी वैष्णव, सन्माननीय IT मंत्रीमहोदय, भारत सरकार: “विशाखापटनम मधील इंडिया AI हबचा भूमीपूजनाचा हा समारंभ सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची भारताला तंत्रज्ञानामध्ये जगात अग्रणी बनवण्याची दूरदूष्टी प्रतिबिंबित करतो.
सन्माननीय एन. चंद्राबाबू नायडूजी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेला पाठिंबा आणि कटिबद्धतेचे अत्यंत आभार की ही दूरदृष्टी त्यांनी ओळखली आहे. विशाखापटनम मध्ये स्थापित होणारे इंडिया AI हब आणि तीन उपसागरी केबल्स देशाच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्वपूर्ण पायाभूत सुविधा ठरणार आहेत.
भारतामध्ये सातत्याने विश्वास दर्शवल्याबद्दल गुगल यांचे अत्यंत आभार.”
आंध्र प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री. एन. चंद्राबाबू नायडू, म्हणाले: “वेग, विश्वास, आणि व्यवसायासाठी सुलभतेच्या पाठिंब्याने आंध्र प्रदेश हे भारताचे एक प्रमुख गुंतवणूक स्थान म्हणून उदयाला येत आहे. विशाखापटनम येथील गुगलचे AI हब हे आपल्या विस्तारणाऱ्या तंत्रज्ञान पट्ट्याचा एक महत्वाचा टप्पा बनेल, जो नाविन्यपूर्णतेला चालना देईल, आणि आपल्या युवा पिढीसाठी उच्च-मूल्याच्या संधी निर्माण करेल. ज्यामुळे जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत आपली स्थिती अधिक मजबूत होईल. आमचे ध्येय केवळ गुंतवणूक आकर्षित करण्याच्याही पलिकडचे आहे — आम्हाला स्थानिक प्रतिभावंत, स्टार्टअप्स, आणि उद्यमांना या तंत्रज्ञान-प्रेरित विकासाच्या वाटचालीमध्ये सक्रिय भागीदार बनवायचे आहे. केंद्र सरकारकडून भक्कम पाठिंब्यासह आणि विकसित भारताच्या ध्येयाच्या अनुरोधाने, गुगलसह ही भागीदारी अत्याधुनिक नाविन्यतेचे समावेशक प्रगतीसह संयोजन करण्याची आमची कटिबद्धता दर्शवते, ज्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशातील प्रत्येक समाजामध्ये संधी पोहोचण्याची खात्री होणार आहे.”
गुगल क्लाउडचे, CEO, श्री. थॉमस कुरियन म्हणाले: “आजचे भूमीपूजन म्हणजे भारत सरकारसह आमच्या सामाईक दूरदृष्टीची शक्तिमान पूर्तता आणि देशाच्या AI-स्थानीय भविष्यासाठी बदलाचा एक प्रारंभ बिंदू आहे. एकत्र मिळून आम्ही विकसित भारत साठी एक पाया उभारत आहोत आणि पूर्ण देशभरात आर्थिक संधींसाठी नवीन द्वारे खुली करत आहोत. गुगलचे AI हब हे सखोल सामुदायिक भागीदारींवर आधारित विकासासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करेल.”
अदानी समूहाचे संचालक, जीत अदानी म्हणाले: “भारताचा AI काळ पायाभूत सुविधांद्वारे परिभाषित केला जाईल. आम्ही जे विशाखापटनम मध्ये उभारत आहोत, एकाच स्थानावर जवळपास 1 GW त्या बदलाचा संकेत देत आहे. जेव्हा उर्जा अधिक किफायती आणि स्वच्छ स्त्रोतांवर अधिकाधिक आधारित असेल, बुद्धिमत्ता अधिकाधिक सुलभ बनेल आणि याच प्रकारे भारत डिजिटल विकासाच्या पुढच्या टप्प्याचे नेतृत्व करेल.”
US$15 अब्जाचा विकसित भारताचा आराखडा
गुगलच्या पाच वर्षांच्या (2026-2030) $15 अब्जाच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून, हबमध्ये एअरटेलद्वारे नेक्स्ट्रा आणि अदानीकनेक्सच्या नेतृत्वात तीन डेटा सेंटर्स कॅम्पसचे वैशिष्ट्य असेल. नेक्स्ट्राचे नैपुण्य अमेरिका-इंडिया कनेक्ट फायबर उपक्रम सक्षम करत आहे, 2030 पर्यंत 500 GW ची गैर-जीवाश्म स्वच्छ उर्जा क्षमता गाठण्याच्या लक्ष्याला पाठिंबा देत आहे, आणि पूर्ण देशभरामध्ये व्यवसायांसाठी कमी-लेटन्सीच्या AI सेवा उपलब्ध करत आहे.
सामुदायिक प्रभावाचे उपक्रम
नेक्स्ट्राच्या प्रादेशिक विस्ताराच्या पाठबळासह गुगलच्या समुदाय-प्रथम दृष्टीकोनामध्ये, पुढील सामिल आहे:
पाणी भविष्य हमी: स्पॉन्ज कोलाबोरेटिव्हसह वॉटरशेड व्यवस्थापन (RO प्लान्ट्स, पाणी ATM, शेती आणि मासेमारीसाठी पाठिंबा).
सागरी व्यापार: संभव फाउंडेशन द्वारे 1,000+ मासेमारांना प्रशिक्षण (GPS, UPI, हितकल्याण योजनांचा लाभ).
तळागाळातील अभिनव उपक्रम: AI प्रयोगशाळा, डिजिटल साक्षरता आणि उद्योजकतेसाठी उडान निधी (चेंजएक्स).
महिला-नेतृत्वाचे उद्यम: 10,000+ महिलांसाठी नारी शक्ती (लर्निंग लिंक्स फाउंडेशन).
कार्यबळाची सज्जता: STAR उपक्रम (1,000+ कुशल कामगार); 1,200+ (ICT ऍकॅडमी)साठी AI प्रशिक्षण.
भारत AI शक्ती परिषद
आंध्र प्रदेश सरकारद्वारे आयोजित या परिषदेने नेक्स्ट्रा पायाभूत सुविधांद्वारे समर्थित AI कॉरिडॉर उभारणे, स्थानिक खरेदीला प्राधान्य देणे आणि SME एकीकरणासाठी भागीदारांना एकत्र आणले.


