पुणे,29 एप्रिल 2026 : मॅरिएट बॉनवॉयच्या जागतिक पोर्टफोलिआचा भाग असलेल्या ल मेरिडियन हॉटेल्स ॲन्ड रिसॉर्टस् तर्फे ल मेरिडियन सुरत सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हे सुरतमधील पहिले ल मेरिडियन हॉटेल असून गुजरातमधील दुसरे आहे.सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ तीन किमी अंतरावर असलेल्या या हॉटेलमध्ये सुरतच्या हिरे व वस्त्रोद्योग वारसापासून प्रेरित सुटससह कलात्मक नक्षीकाम असलेल्या 185 गेस्ट रूम्स आहेत.


