Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपनवेल महानगरपालिकेच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरास उत्साही प्रतिसाद* *खारघर...

पनवेल महानगरपालिकेच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरास उत्साही प्रतिसाद* *खारघर व पनवेल साठी वरिष्ठ बॅच फुल*

 

 

*शिक्षक/प्राध्यापकांसाठी विशेष बॅच.. कळंबोली येथे काहीच जागा शिल्लक*

पनवेल, दि.3 :- पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 मे पासून नऊ दिवसांच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यास कलावंतांनी उत्साही प्रतिसाद दिला असून पनवेल व खारघर येथील वरिष्ठ बॅच फुल झाली असून इतर बॅचच्या काही मोजक्याच जागा शिल्लक आहेत.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नाट्यसंस्कृती चळवळीस चालना मिळावी, कलावंतांना मोठे व्यासपीठ मिळावे व सांस्कृतिक उपक्रम वाढावेत या करिता महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार खारघर, कळंबोली व पनवेल येथे अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात कळंबोली येथे शिक्षक- प्राध्यापक कलावंतांसाठी विशेष बॅचचे नियोजन करण्यात आले आहे.

युवा गटासाठी सकाळी 9 ते 12 व प्रौढ गटासाठी दुपारी 2 ते 5 अशी वेळा असतील. सर्व कलावंतांसोबत चर्चेअंती यात बदल केला जाईल. त्याचप्रमाणे पनवेल आणि खारघर येथे एक बॅच ही उच्चस्तरीय अभिनय प्रशिक्षणासाठी आहे. गतवर्षीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक वरिष्ठस्तरीय प्रशिक्षण मिळावे यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.एक विशेष बॅच शिक्षक प्राध्यापकांसाठी असेल.शाळांमधील मुलांना अभिनय नाट्य विषयक प्रशिक्षण आवश्यक आहे त्याकरिता संबंधित शाळेतील शिक्षकांना अधिक प्रशिक्षित केले तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पनवेल, कळंबोली व खारघर येथे कलावंतांसाठी हे शिबिर मोफत आहे.

*प्रत्येकी दोन गट*

अभिनय प्रशिक्षण शिबीरासाठी प्रत्येक सेंटरवर दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यात पहिला गट विभाग म्हणजे वय वर्षे 8 ते 16 हा युवा गट व प्रौढ गट म्हणजे 17 ते 65 वयांपर्यंत कलावंतांना यात सहभाग घेता येईल. हे शिबीर मोफत आहे . संख्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या 30-30 नाट्यकर्मींनाच या शिबिरासाठी प्रवेश दिला जाईल.

नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेवटी सर्वांचे सादरीकरण होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी *दिनांक 7 मे 2026* पर्यंत करावी.असे आवाहन पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्यावतीने करण्यात येत आहे.

*संपर्क*

शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

1.शामनाथ पुंडे-

मो.नं : 9821758147

2. गणेश जगताप

मो.नं.9870116964

3..श्रीमती स्मिता गांधी

मो.नं. 9323489693

4. सौ. वर्षा कुलकर्णी

मो.नं. 7715815127 5. डॉ. राजू पाटोदकर मो.नं. 9892108365

………

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments