Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedओबेन इलेक्ट्रिक कडून रोर ईवीओ लाँच

ओबेन इलेक्ट्रिक कडून रोर ईवीओ लाँच

नवी दिल्ली, एप्रिल ३०, २०२६: ओबेन इलेक्ट्रिक या भारतातील संशोधन व विकास (R&D) आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्‍पादक कंपनीने आज पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी Rs. 99,999 (एक्‍स-शोरूम) या विशेष सुरुवातीच्या किमतीत संपूर्णपणे नवीन रोर ईवीओ च्‍या लाँचची घोषणा केली. या श्रेणीमध्ये स्पष्ट बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन केलेल्‍या रोर ईवीओ मध्‍ये डिझाइन, परफॉर्मन्स आणि कार्यक्षमतेचे संयोजन आहे, ज्यामुळे रायडर्सना इलेक्ट्रिक मोटरसायकलकडून असलेल्या अपेक्षांना नव्‍या उंचीवर नेण्‍यात आले आहे.

 

रायडर्सना रोमांच आणि व्यावहारिकता यांपैकी एकाची निवड करावी लागू नये, या संकल्पनेवर आधारित रोर ईवीओ निर्मिती करण्यात आली आहे. रिअल-वर्ल्ड प्रवासासाठी ही एक संपूर्ण आणि तडजोड न करणारी मोटरसायकल म्हणून डिझाइन करण्‍यात आली आहे. यात आक्रमक स्ट्रीटफायटर डिझाइनसह दमदार परफॉर्मन्स आणि विचारपूर्वक समाविष्ट केलेली वैशिष्ट्ये आहेत, जी राइड करताना जितका आनंद देतात तितकीच दैनंदिन वापरासाठी सुलभ देखील आहेत.

 

पहिल्याच नजरेत, रोर ईवीओ आकर्षक, शक्तिशाली रचना आणि लक्षवेधक पवित्रासह उठून दिसते. समोरील बाजूस सिग्नेचर फ्रंट पोझीशन लॅम्‍पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आला आहे, जो एक खास ओळख निर्माण करण्यासोबत दैनंदिन प्रवासात अधिक स्पष्ट दृश्यमानता देतो. सुबकपणे घडवलेले बॉडी पॅनल्स, उत्कृष्ट तपशील आणि समतोल आकाररेषा याची रस्त्यावरील उपस्थिती अधिकच ठळक करतात.

 

Rorr EVO ११० किमी/तास टॉप स्‍पीड देते आणि १८० किमी आयडीसी प्रमाणित रेंज देते, ज्यामुळे आव्‍हानात्‍मक दैनंदिन प्रवासासाठी देखील तितकीच सक्षम ठरते. ओबेन प्लग (फास्ट चार्जर) द्वारे ही मोटरसायकल्‍स अवघ्या ९० मिनिटांत ०-८० टक्‍के चार्ज होते, तर सोयीस्कर दैनंदिन चार्जिंगसाठी यात ओबेन पोर्ट हा ऑनबोर्ड चार्जर देखील देण्यात आला आहे.

 

या अनुभवामधील खासियत म्हणजे सादर करण्‍यात आलेले स्मार्ट आयक्यू, ओबेनचे नवीन एआय राइड मोड, जे रिअल-टाइममध्ये रायडिंग पद्धतीचे विश्‍लेषण करते आणि रेंज १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी पॉवर डिलिव्हरी उत्तम प्रकारे व्यवस्थापित करते. रायडरच्या वागणुकीनुसार स्वयंचलितपणे जुळवून घेत स्मार्ट आयक्यू सतत मॅन्युअली बदल करण्याची गरज दूर करते, ज्यामुळे परफॉर्मन्स आणि कार्यक्षमता यांचे विनासायास संयोजन साधले जाते.

 

या मोटरसायकलमध्‍ये IP68-rated motor शक्ती आहे, जिचे डिझाइन, विकास आणि निर्मिती ओबेन इलेक्ट्रिकने इन-हाऊस केली आहे. हे इंजिन नवीन सिंगल-स्टेज चेन ड्राइव्हला जोडलेले आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि चाकांवर अधिक टॉर्क देऊन प्रवासाचा अधिक रोमांचक अनुभव देते. Rorr EVO मध्ये ओबेनची स्वतःची ३.४ केडब्‍ल्‍यूएच हाय-परफॉर्मन्स LFP बॅटरी आहे. पारंपारिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत ही बॅटरी ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उष्णता प्रतिकारशक्ती आणि २ पट अधिक कार्यकाळ देते, ज्यामुळे सुरक्षितता आणि विश्वासार्हता जपली जाऊन दीर्घकाळ सातत्यपूर्ण कामगिरी मिळते. बॅटरीला अधिक सुरक्षित करण्यासाठी बॅटरी उच्च-क्षमतेच्या अॅल्युमिनियम स्ट्रक्चरमध्ये ठेवण्यात आली आहे आणि यावर ८ वर्षांची वॉरंटी दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांचा दीर्घकालीन मालकीचा आत्मविश्वास अधिक वाढतो.

 

या दर्जाचे इंजिनिअरिंग ओबेनच्या सखोल व्हर्टिकल इंटिग्रेशनमुळे शक्य झाले आहे, ज्यामध्ये मोटर, बॅटरी, चार्जर, डिस्प्ले आणि वेईकल कंट्रोल सिस्टमसह संपूर्ण सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर स्टॅक पूर्णपणे कंपनीमध्‍ये इन-हाऊस विकसित केले आहेत. हा दृष्टिकोन अधिक कडक गुणवत्ता नियंत्रण, जलद नवनिर्मिती आणि अधिक विश्वासार्ह मालकीचा अनुभव सुनिश्चित करतो.

 

कामगिरीच्या पलीकडे जात Rorr EVO आपल्या श्रेणीतील व्यवहार्यतेचा नवीन मापदंड प्रस्थापित करते. यामध्ये ६८० मिमीची या श्रेणीतील सर्वात लांब सीट देण्यात आली आहे, जी रायडर आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या आरामासाठी सलग युनिटमध्ये डिझाइन केली आहे. तसेच ७८० मिमीची सीट उंची या श्रेणीतील सर्वात सुलभ उंचींपैकी एक आहे. मोटरसायकलमध्ये पहिल्यांदाच Rorr EVO मध्ये एकूण १० लिटरची स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे, ज्यामध्ये अंडर-सीट स्टोरेज आणि टँक पॉड स्टोरेजचा समावेश आहे. सोबत dual यूएसबी चार्जिंग पोर्ट्स देखील आहेत, जे या श्रेणीत क्वचितच आढळणारी दैनंदिन सोय उपलब्ध करून देतात. शहरातील गर्दीच्‍या ठिकाणी वापर सुलभ करण्यासाठी यात रिव्हर्स मोड देखील देण्यात आला आहे.

 

780 मिमी सीटची उंची आणि 200 मिमी ग्राउंड क्लीअरन्स यांचे अनोखे संयोजन Rorr EVO भारतीय बाजारपेठेतील सर्वात आरामदायक आणि व्यावहारिक मोटरसायकल बनवते. रोर इव्होमध्ये २३० मिमी वॉटर-वेडिंग क्षमता देखील आहे, ज्यामुळे ती विविध रस्ते आणि हवामानातील परिस्थितींसाठी अत्यंत योग्य ठरते.

 

सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी हे देखील Rorr EVO अनुभवाचे अविभाज्य भाग आहेत. या मोटरसायकलमध्ये इमर्जन्सी असिस्टसह Fall अलर्ट हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे, जे मोटरसायकल पडल्यास लगेच ओळखते आणि ओबेन अॅपद्वारे अलर्ट पाठवते, तसेच आवश्यक असल्यास आपत्कालीन संपर्कांना सूचित करते. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी यामध्ये युनिफाइड ब्रेक असिस्ट (यूबीए), ड्रायव्हर अलर्ट सिस्टम (डीएएस), सिक्युअर चार्ज आणि उत्तम स्थिरतेसाठी रुंद मागील TYRE यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

 

Rorr EVO ५-इंचाचा कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो नेव्हिगेशन, राइड डेटा आणि कॉल, मेसेज व म्युझिकसाठी स्मार्ट अलर्ट्स प्रदान करतो. ओबेन इलेक्ट्रिक अॅपद्वारे रायडर्स राइड हिस्ट्री, जिओ-फेन्सिंग, रिमोट डायग्नोस्टिक्स, चोरीपासून संरक्षण, फाइंड माय रोर आणि २४x७ सेवा सपोर्ट मिळवू शकतात. तसेच ६८,००० पेक्षा जास्त चार्जिंग नेटवर्क उपलब्‍ध होत असल्‍यामुळे मालकीचा अनुभव पूर्णपणे कनेक्टेड राहतो.

 

या लाँचबद्दल मत व्‍यक्त करत ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापिका आणि सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “भारतातील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्र एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे रायडर्स आता इलेक्ट्रिक मोटरसायकल फक्त पर्यायी वाहन म्हणून पाहत नाहीत, तर एक स्वतंत्र आणि सक्षम मोटरसायकल म्हणून पाहत आहेत. Rorr EVO याच विश्वासावर आधारित आहे. हे एक तडजोड न करणारे उत्पादन आहे, जे हे सिद्ध करण्यासाठी डिझाइन केले आहे की इलेक्ट्रिक वाहने खऱ्या रायडिंगच्या संपूर्ण अनुभवाची बरोबरी करू शकतात आणि त्याला मागे टाकू शकतात; तेही निवडकपणे नव्हे, तर पूर्णपणे. हा बदल रस्त्यावर आणण्यासाठीच Rorr EVO ची रचना करण्यात आली आहे.”

 

Rorr EVO चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – पल्स रेड, न्यूट्रॉन ब्लू, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट. हे प्रत्येक रंग मोटरसायकलच्‍या आकर्षक आणि आक्रमक स्वरूपाला साजेसे असे डिझाइन केलेले आहेत.

 

ही मोटरसायकल पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी Rs. 99,999 (एक्‍स-शोरूम) या सुरुवातीच्या विशेष किमतीत उपलब्ध आहे, त्यानंतर मोटरसायकलची किंमत Rs. 124999 (एक्‍स-शोरूम) असेल. या मोटरसायकलची बुकिंग आता फक्त ७७७ रूपयांमध्ये सुरू झाले आहे. जून २०२६ पासून Oben च्या देशभरातील १५० शोरूम्समध्ये टेस्ट राइड्स आणि ग्राहकांना डिलिव्हरी

देण्यास सुरुवात होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments