पुणे २ मे २०२६ : १ मे रोजी एमओए दिनानिमित्त महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन (एमओए) तर्फे दिनांक १ मे ते ७ मे २०२६ दरम्यान विविध जागरूकता उपक्रम हाती घेण्यात आले असून, हाडे, सांधे व मणक्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे. या वर्षीची संकल्पना आपले गुडघे वाचवा • आपले मणके वाचवा • आपले हाडे वाचवा”*
या कार्यक्रमाचे उद्घाटन संचेती हॉस्पिटल, पुणे येथे मान्यवर ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि एमओए तसेच पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी संचेती हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ. पराग संचेती , महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन चे अध्यक्षडॉ. एन. जे. कर्णे, एमओए चे सचिव व पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी चे अध्यक्ष डॉ. प्रशांत टोनपे, एमओए चे मुख्य समन्वयक डॉ. सचिन आबणे, पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी चे खजिनदार डॉ. मुकेश धर्मा , निर्वाचित सचिव, डॉ. मनीष कुलकर्णी, संचेती हॉस्पिटल येथील वरिष्ठ ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सक डॉ. अतुल पाटील , संचेती हॉस्पिटल मधील वरिष्ठ स्पाइन सर्जन डॉ. शैलेश हडगांवकर
यावेळी बोलताना एमओए चे अध्यक्ष डॉ. एन. जे. कर्णे यांनी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या स्थापना दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, २०१८ पासून डॉ. पराग संचेती यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात १ मे हा दिवस “एमओए डे” म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी १ मे ते ७ मे या कालावधीत महाराष्ट्रभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात.
या उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये हाडांचे आरोग्य, सांध्यांचे विकार, मणक्यांचे आजार, ऑस्टिओपोरोसिस, गुडघे व पाठदुखी प्रतिबंध, तसेच निरोगी जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करण्यात येते.
एमओए डे सेलिब्रेशन वीक दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जनजागृती व्याख्याने, मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिबिरे, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिरे, सार्वजनिक संवाद कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्तानं संचेती हॉस्पिटल मध्ये आयोजित मोफत तपासणी शिबिरात ५०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला
.


