Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपळे गुरव येथे १४ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा*

पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा*

 

पुणे, दि. ११ (जिमाका, वृत्तसेवा): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे तथा प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १४ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हा रोजगार मेळावा न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, समर्थ नगर, एस.बी.आय. बँकेसमोर, नवी सांगवी, पुणे येथे होणार असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती (Walk-in-Interview) घेण्यात येणार आहेत.

 

मेळाव्यात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लि., कमिन्स इंडिया लि., फोर्स मोटर्स लि., हुंदाई मोटर्स इंडिया लि. यांसह पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी व ऑनलाइन अर्जासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in महा स्वयंरोजगार संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो व Resume च्या किमान १० प्रती सोबत आणाव्यात.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. सु.रा. वराडे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments