Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी आमदार उषादेवी जगदाळे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली*

माजी आमदार उषादेवी जगदाळे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली*

 

 

*लोकाभिमुख आणि स्नेहशील नेतृत्व हरपले*

*-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

 

पुणे, दि. 14 : दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असून, त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक स्नेहशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “माँ” म्हणून सर्वपरिचित असलेल्या उषादेवी जगदाळे यांनी दोन वेळा आमदार म्हणून दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जनतेची निष्ठेने सेवा केली. त्यांचे पती कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे यांनीही आमदार म्हणून तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले. जगदाळे कुटुंबाचा वारसा त्यांचे सुपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे समर्थपणे चालवत आहेत. जगदाळे पाटील कुटुंब हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे घराणे म्हणून ओळखले जाते.

जनतेशी असलेली त्यांची आत्मीयता, साधेपणा आणि समाजासाठीची बांधिलकी कायम स्मरणात राहील. पवार कुटुंब आणि जगदाळे कुटुंब यांचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उषादेवींच्या जाण्याने केवळ जगदाळे कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ही पवार कुटुंबासाठीदेखील वैयक्तिक हानी आहे.

 

या प्रसंगी जगदाळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

******

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments