Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedयूडब्‍ल्‍यूए इंडियाकडून ऐतिहासिक वार्षिक शिष्यवृत्ती कटिबद्धतेची घोषणा

यूडब्‍ल्‍यूए इंडियाकडून ऐतिहासिक वार्षिक शिष्यवृत्ती कटिबद्धतेची घोषणा

 

Pune, 12 May, 2026: युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने (यूडब्‍ल्‍यूए) यूडब्‍ल्‍यूए इंडियाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक शिष्यवृत्ती प्रोग्रामची घोषणा केली आहे. भारतातील बाजारपेठेमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्वतंत्र कटिबद्धता मानली जात आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण अधिक सुलभ करण्याच्या यूडब्‍ल्‍यूएची दीर्घकालीन कटिबद्धता या उपक्रमामुळे अधिक दृढ झाली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे व्‍हाइस-चान्‍सलर प्रोफेसर अमित चकमा म्हणाले, “या ऐतिहासिक शिष्यवृत्ती घोषणेमधून भारताप्रती यूडब्‍ल्‍यूएची सखोल आणि कायमस्वरूपी कटिबद्धता दिसून येते. आम्ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त यूडब्‍ल्‍यूए शिक्षणाची व्याप्ती वाढवत आहोत आणि आर्थिक मर्यादांमुळे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्‍ये व्‍यत्‍यय येणार नाही, याची काळजी घेत आहोत. भारतातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता ओळखून जागतिक करिअरसाठी तयार करणे हे आमचे ध्येय आहे.”

यूडब्‍ल्‍यूए इंडियासाठी प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससह, यूडब्‍ल्‍यूए इंडिया एसटीईएम, व्‍यवसाय आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर प्रोग्राम्‍स उपलब्ध करून देणार आहे. हे प्रोग्राम्‍स जागतिक उद्योगांची मागणी आणि भारताच्या बदलत्या कार्यबलाच्या गरजांशी सुसंगत असतील. विद्यार्थी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.uwa.edu.au/india ला भेट देऊ शकतात.

प्रामुख्याने शिक्षण शुल्कातील सवलतीच्या स्वरूपात दिली जाणारी हा बहु-स्तरीय शिष्यवृत्ती आराखडा शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक गरज, नेतृत्व क्षमता आणि प्रादेशिक समावेशकता या गोष्टींची दखल घेतो. हा आराखडा भारतीय नियामक आवश्यकता आणि यूडब्‍ल्‍यूएच्या जागतिक मानकांशी सुसंगत आहे. या प्रोग्राममध्‍ये गुणवत्ता शिष्यवृत्ती, जागतिक उत्कृष्टता शिष्यवृत्ती, इक्विटी आणि सीएसआर-समर्थित निधी, राज्य सरकारांच्या सहयोगाने उपलब्ध संधी (सुरुवातीला महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये) आणि माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळावर आधारित शिष्यवृत्तींचा समावेश आहे.

प्रमाण आणि शैक्षणिक दर्जा यांचा समतोल राखण्यासाठी डिझाइन केलेला हा प्रोग्राम पात्र विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त प्रकारच्या मदतीचा लाभ घेण्याची सुविधा देतो, ज्यामुळे शैक्षणिक निकालांचा दर्जा राखून आर्थिक अडथळे लक्षणीयरित्या कमी होतात. सर्व शिष्यवृत्तींचे नियंत्रण यूडब्‍ल्‍यूएच्या प्रस्थापित धोरणांतर्गत केले जाईल आणि प्रत्येक प्रवेश चक्रापूर्वी पारदर्शक पात्रता निकष प्रकाशित केले जातील.

हा शिष्यवृत्ती प्रोग्राम यूडब्‍ल्‍यूए इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेशोबतच लागू केला जाईल आणि पहिल्या प्रवेशापासून ऑफरमध्ये शिष्यवृत्तींचा समावेश असेल. या आराखड्याचे पहिल्या वर्षानंतर औपचारिक पुनरावलोकन केले जाईल, ज्यामध्ये मागणी, परिणाम आणि विस्ताराच्या संधींचे मूल्यमापन केले जाईल.

शिष्यवृत्तीला आपल्या भारतातील धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून यूडब्‍ल्‍यूए शिक्षण सुलभता, परवडणारे दर आणि शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. तसेच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दीर्घकालीन शिक्षण आणि कौशल्य भागीदारी अधिक दृढ करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments