मुंबई १५ मे २०२६ : अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी ) ने आर्थिक वर्ष २०२६ चे निकाल जाहीर केले आहेत . कार्यवाहक उत्पन्नात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ११.५% वाढ झाली असून ३९४९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निव्वळ नफ्यात १३ % वाढ झाली असून २२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे . संचालक मंडळाने कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीसाठी, आर्थिक वर्ष FY26 करिता २७०% (म्हणजेच प्रत्येकी ₹ २/- दर्शनी मूल्य असलेल्या (पूर्णतः भरणा झालेल्या) प्रत्येक इक्विटी शेअरवर रुपये ५.४ लाभांशाची शिफारस केली आहे.


