Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल*  

जनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल*  

 

 

पुणे, दि. १५ (जिमाका,वृत्तसेवा) : भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद क्षेत्रात जनगणना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉलनट स्कूल, फुरसुंगी येथील ७ शिक्षक व सपोर्ट स्टाफ सदस्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहून जनगणना कामकाज करण्यास नकार दिल्याची तक्रार फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.

 

कर अधिकारी आबासो दादासो मुढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगर परिषद क्षेत्रातील १६ वॉर्डांमध्ये २८४ घरगट तयार करण्यात आले असून जनगणना कामकाजासाठी २८४ प्रगणक व ४२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद कार्यालयात जनगणना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

 

सदर प्रशिक्षणासाठी वॉलनट स्कूल येथील प्रणिता सिन्हा, अश्विनी देवरे, इपशिता मोहंती, श्रद्धा तमशेट्टी, मनिषा हतागळे, उज्वला लोंढे व शशिकला सिद्धे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रशिक्षणास गैरहजर राहत जनगणना कामात अडथळा निर्माण केला तसेच नेमून दिलेले काम करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी दिलेल्या आदेशान्वये संबंधितांविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले असून पुढील कार्यवाही फुरसुंगी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments