Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर,युवकांना सहभागी होण्याचे आवाहन*

पुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर,युवकांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १५ : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत MY Bharat, पुणे यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी गेट क्रमांक २, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, चाकण येथे इंटर्नशिप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

 

या शिबिरामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५०० जागा तसेच आयटीआय पात्र उमेदवारांसाठी १० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या १८ ते २५ वयोगटातील आणि पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या युवकांना प्रतिमहिना १८ हजार रुपये मानधन तसेच ६ हजार रुपये जॉइनिंग ग्रँट देण्यात येणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिन्यांचा राहणार आहे.

पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, बायोडाटा तसेच आधार कार्ड किंवा इतर जन्मतारीख पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी सोबत देण्यात आलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments