पुणे, भारत – 14 मे 2026: इंटर्नल कम्बशन इंजिन, जनरेटर संच आणि कृषी उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेली, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ठसा उमटविलेल्या ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ (KOEL) (BSE: 533293; NSE: KIRLOSENG) या कंपनीने, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल आज जाहीर केले.
निकालांवर भाष्य करताना, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “आर्थिक वर्ष 26ची सांगता KOEL ने अत्यंत दमदारपणे केली असून, आम्ही आमच्या इतिहासातील सर्वाधिक त्रैमासिक विक्रीची नोंद केली आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो. चौथ्या तिमाहीत (Q4), आमची निव्वळ विक्री ₹ 1,522 कोटींवर पोहोचली; जी मागील वर्षाच्या तुलनेत 24% जास्त आहे. यामुळे आमची संपूर्ण वर्षाची निव्वळ विक्री ₹ 5,604 कोटींवर पोहोचली असून, ती 25% वार्षिक वाढीचे प्रतीक आहे. आमचे हे यश शाश्वत आणि वाढीव नफ्यासाठी असलेल्या वचनबध्दतेमध्ये रुजलेले आहे; आमचे दुहेरी अंकी EBITDA मार्जिन्सच्या हा याचाच पुरावा आहे.”
या वर्षी आमच्या सर्व व्यवसायांमध्ये अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणे, बाजारपेठेत अधिक खोलवर प्रवेश करणे आणि शिस्तबद्ध वाढ साधणे यावरच लक्ष होते. पॉवरजेनने कमी, मध्यम आणि उच्च हॉर्सपॉवर विभागांमध्ये दमदार कामगिरी केली, ज्यामुळे बाजारपेठेतील हिस्सेदारीत वाढ झाली. आमच्या औद्योगिक व्यवसायाने नवीन प्रयोगांमध्ये विस्तार करून आणि ओईएम (OEMs) सोबतचा सहभाग अधिक दृढ करून सागरी, रेल्वे आणि बांधकाम क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. सुधारित सेवा विस्तार आणि संपूर्ण वस्तूंच्या क्षेत्रात प्रवेशामुळे किर्लोस्कर केअरला लक्षणीय वेग मिळाला आहे. आम्ही आमच्या फ्लुइड डायनॅमिक्स व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रमही हाती घेतला, ज्यामध्ये उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करताना अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी कामकाज एकत्रित केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर असलेले आमचे सातत्यपूर्ण लक्ष आता निकालांमध्ये दिसू लागले आहे, कारण आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय विक्री अधिक वेगाने वाढली आहे. यासोबतच, आम्ही सुधारित इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि फायदेशीर वाढीवर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करून कामकाजातील शिस्त अधिक मजबूत करणे सुरू ठेवले.
‘2B2B’ या उद्दिष्टाच्या दिशेने सुरू असलेला आमचा परिवर्तनाचा प्रवास नेहमीच एका सरळ रेषेत कदाचित होणार नाही; तरीही, आमच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओची ताकद आणि ऑपरेशनल लवचिकता हे घटक शाश्वत विकासासाठी
एक भक्कम पाया पुरवत आहेत. एक कणखर आणि कृती-केंद्रित संस्था उभारण्याच्या आमच्या कटिबद्धतेवर आम्ही ठाम आहोत, जी आमचे गुंतवणूकदार आणि ग्राहक—या दोघांनाही—सातत्याने दीर्घकालीन मूल्य प्रदान करेल.”
संचालक मंडळाने आर्थिक वर्षासाठी एकूण 350% लाभांशाचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये 125% (म्हणजेच प्रति शेअर ₹2.50) च्या अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त, 225% (म्हणजेच प्रति शेअर ₹4.50) च्या अंतिम लाभांशाचा समावेश आहे; हा अंतिम लाभांश भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.
चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र)^^:
Rs. Cr
Q4 FY26
Q4 FY25
YoY
FY 26
FY 25#
YoY
विक्री
1,522
1,225
24%
5,604
4,481
25%
ऑपरेशन्समधून महसूल
1,535
1,236
24%
5,647
4,521
25%
ईबीआयटीडीए
193
152
27%
737
552
33%
ईबीआयटीडीए मार्जिन %
12.6%
12.3%
13.1%
12.2%
निव्वळ नफा
118
92
28%
464
343
35%
रोख आणि रोख समतुल्य* ₹ 552 कोटी
* कर्ज वजा करून; यात सरकारी गुंतवणुकीचा समावेश आहे आणि दावा न केलेले लाभांश वगळण्यात आले आहेत.
चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित)^^:
Rs. Cr
Q4 FY26
Q4 FY25
YoY
FY 26
FY 25#
YoY
ऑपरेशन्समधून महसूल
2,116
1,749
21%
7,701
6,329
22%
करपश्चात नफा (PAT)
162
111
47%
582
416
40%
^^ अहवालात नमूद केलेले आकडे केवळ चालू कामकाजाशी संबंधित असून, जेथे लागू असेल तेथे त्यातून अपवादात्मक बाबी वगळण्यात आल्या आहेत.
कंपनीच्या स्वतंत्र “व्यवसाय-ते-ग्राहक” (“B2C”) व्यवसायाचे कामकाज, जे स्लम्प सेल तत्त्वावर तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, त्यास कंपनीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आर्थिक निकालांमध्ये सादर सर्व कालावधींसाठी खंडित कामकाज म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. सदर व्यवहार हा पूर्ण मालकीच्या उपकंपनीसोबत असल्याने, लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांवर याचा कोणताही परिणाम होत नाही.
# मागील वर्षाची, म्हणजेच आर्थिक वर्ष 25 (FY25) ची आकडेवारी; मागील वर्षांमध्ये केलेल्या विक्रीपोटी एका ग्राहकाकडून येणे असलेल्या थकीत रकमांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीची रिव्हर्सल वगळून दर्शविली आहे. चालू कालावधीमध्ये अशा प्रकारची कोणतीही रिव्हर्सल नाही. सदर रिव्हर्सल समाविष्ट करून, मागील वर्षाची म्हणजेच आर्थिक वर्ष 25ची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
– स्वतं
त्रपणे EBITDA मार्जिन 13.1% होते.
एकत्रित स्तरावर निव्वळ नफा ₹ 447 कोटी होता.


