पुणे – जेष्ठ पत्रकार शेखर कानेटकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
श्री. कानेटकर यांनी दैनिक संध्या मधून त्यांच्या पत्रकारितेस प्रारंभ केला. त्यानंतर दैनिक तरुण भारत, लोकमत व प्रभात या दैनिकांमध्ये सुमारे चार दशके विविध पदांवर काम केले. अत्यंत स्वच्छ सुंदर हस्ताक्षर, उत्कृष्ट वृत्तपत्र लेखन त्यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकार संघातर्फे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


