पुणे:- पुणे महानगरपालिका मुख्य सभेच्या समोर ९० दिवस प्रलंबित असणारे विषय आणि स्थायी समिती समोर प्रलंबित असणारे ४५ दिवस विषयांबाबत. महापालिकेच्या तीन माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी नगर सचिव सौ.योगिता भोसले यांचे लक्ष वेधले आहे.नगर सचिव यांना याबाबत एक पत्र दिले असून त्यात नमूद केले आहे की
महानगरपालिका अधिनियम कामकाज नियमावली यानुसार माननीय मुख्य सभेसमोर ९० दिवस आणि स्थायी समितीच्या समोर ४५ दिवस जे विषय प्रलंबित आहेत त्याचे निर्णय घेतलेले नाहीत ते विषय मंजूर झाले आहेत (deemed sanctioned) असे सर्व विषय आपण माननीय महापौर, माननीय आयुक्त यांच्याकडे मंजूर झाले म्हणून पाठवून द्यावे अशी विनंती आहे .या पत्राची प्रत महापौर, आयुक्त तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.


