Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेवळ ‘युद्धजन्य परिस्थिती’मुळे नव्हे, ‘परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने देशात ‘आर्थिक...

केवळ ‘युद्धजन्य परिस्थिती’मुळे नव्हे, ‘परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने देशात ‘आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती’..!काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची घणाघाती टीका

  • …* पुणे  : देशाचे ‘सतत बदलते व अस्थिर परराष्ट्र धोरण’, देशात पसरत चाललेली अशांतता व बिघडत चाललेला सामाजिक सलोखा, वाढता कट्टरतावाद व अमेरीकेच्या दबावाखाली भारत स्वीकारत असलेल्या सततच्या समझोत्याच्या भुमिके’मुळे देशास आयात – निर्यातीसाठी अमेरिकेचे अन्यायकारक ट्रेड डील व वाढते टॅरीफ’दर स्वीकारावे लागत असून, या सर्व हालाखीच्या स्थितीत कंटाळून देशातील परकीय गुंतवणूकदार हे गेल्या काही महिन्यांपासून (२०२६ मध्ये) भारतातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर काढून घेत असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.भारतातील परकीय गुंतवणूकदारांनी सुमारे  १ कोटी ८० लाख परकीय गुंतवणूक देशाबाहेर नेल्याचा अहवाल ‘फायनाशियल टाईम्स’ ने नुकताच जारी केल्याचा संदर्भ देत काँग्रेस ने देश हिताच्या, लोकशाही वादी ‘सत्यशोधक, वास्तववादी व निर्भिड पत्रकारीतेचे’ अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की ‘परकीय गुंतवणूक दारांचे व्यतिरिक्त’ ही गेल्या २-३ वर्षांत भारतीय गुंतवणूकदार व भांडवलदार देखील देश सोडून विदेशात जाऊन आपले नागरिकत्व स्थापित करत आहेत व त्यांचा ही मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे ही गेल्या ७५ वर्षातील देशासाठी सर्वाधिक नामुष्कीची व शरमेची बाब आहे.

या सर्वांचाच अनिष्ट परीणाम भारताच्या परकीय गंगाजळी’वर होत असून, देशाचा विकास दर कमी होण्यात, महागाई व बेरोजगारी वाढण्यात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र भाषण जीवी मोदी सरकार वास्तवतेकडे अक्षम्य डोळेझाक करत असून, बेफिकीर पंतप्रधान मोदी विदेशात ‘स्वागत सत्कार’ स्वीकारत असल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

————————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments