Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॅटरी आणि इलेक्ट्रिफिकेशनला गती देण्यासाठी ह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे भारतभर नेटवर्कचा विस्तार

बॅटरी आणि इलेक्ट्रिफिकेशनला गती देण्यासाठी ह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे भारतभर नेटवर्कचा विस्तार

नवी दिल्ली ,18 मे 2026 : ह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स (ह्युंदाई सीओई) चा भारतात विस्तार करण्यात येत असून बॅटरी आणि इलेक्ट्रिफिकेशनच्या तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासाला गती देण्यासाठी शैक्षणिक-औद्योगिक भागीदारांचे भारतभर नेटवर्क उभारण्यात येत आहे.

 

या नेटवर्कला बळकटी देत ह्ंयुदाई मोटर ग्रुपने आयआयटी कानपूर,आयआयटी हैदराबाद,विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (व्हीएनआयटी) नागपूर आणि तेजपूर युनिव्हर्सिटी या चार भागीदार संस्थांसोबत करारांना औपचारिक स्वरूप दिले आहे.या नवीन समावेशांमुळे हे सहयोगी व्यासपीठ सात विद्यापीठांच्या संघात रूपांतरित झाले आहे.2025 मध्ये आयआयटी मद्रास,आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे या संस्थापक भागीदारांसह हे व्यासपीठ सुरू झाले आहे.यामुळे स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची आणि भारतासाठी विशेष मोबिलिटी सोल्युशन्स विकसित करण्याची समुहाची वचनबध्दता अधिक दृढ झाली आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments