Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोशी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू*

मोशी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू*

 

पुणे, दि. 19 (जिमाका,वृत्तसेवा) :पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून बिगरव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ११ वी प्रथम वर्षासाठी अंदाजे ५१ रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

 

प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य भोजन, निवास, क्रमिक पुस्तके, अभ्यासिका, ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, ओपन जिम तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय गणवेश, निर्वाह भत्ता, प्रोजेक्ट साहित्य, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बॉयलर सूट, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी स्टेथोस्कोप आदी सुविधांसाठी शासनमान्य आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

 

वसतिगृहासाठी अर्ज करणारा विद्यार्थी स्थानिक नसून बाहेरगावचा असावा. संबंधित विद्यार्थ्याने पिंपरी-चिंचवड किंवा पुणे महानगरपालिका हद्दीत अथवा त्या हद्दीपासून ५ कि.मी. अंतरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

 

इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments