या सहकार्यामुळे देशातील उच्च क्षमतेच्या संशोधन संस्थांमध्ये विकसित होणाऱ्या कल्पनांना व्यापक सामाजिक परिणाम घडवून आणणाऱ्या उपायांमध्ये रूपांतरित करण्यास मदत होणार ~
India| 19th May 2026: वाधवानी फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांनी नुकताच सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचा उद्देश नॅशनल इनोव्हेशन नेटवर्क (NIN)च्या माध्यमातून भारतातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला नवी चालना देणे हा आहे. NIN हे वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (WIN)चे राष्ट्रीय स्तरावरील विस्तारित रूप आहे.
हे सहकार्य भारताच्या विकासाशी थेट संबंधित असलेल्या क्षेत्रांवर केंद्रित असेल, जसे की आरोग्य, पोषण, बायोटेक्नॉलॉजी, जीनोमिक्स, मेडटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे. या उपक्रमाचा उद्देश केवळ संशोधनाला प्रोत्साहन देणे नसून, त्या संशोधनाचे समाजासाठी उपयुक्त आणि मोठ्या प्रमाणावर परिणामकारक उपायांमध्ये रूपांतर करणे आहे.
या उपक्रमांतर्गत गेट्स फाउंडेशन पुढील पाच वर्षांत NIN अंतर्गत पाच सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoEs)ना पाठबळ देणार आहे. त्यापैकी दोन केंद्रांची सुरुवात यावर्षीच होणार आहे.
ही केंद्रे संशोधक आणि नवोन्मेषकांना त्यांच्या प्रयोगशाळेतील सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधनाला (TRL-4+) प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी मदत करतील. यामध्ये प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट, प्रोटोटायपिंग, व्हॅलिडेशन, पायलट डिप्लॉयमेंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी (IP) सहाय्य, कमर्शियलायझेशन, स्टार्टअप निर्मिती आणि उद्योग भागीदारी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता समाज आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचेल.
वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (WIN)ची सुरुवात 29 एप्रिल 2025 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. भारतातील शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूक भागीदार यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून संशोधनातून बाजारपेठेकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने वाधवानी फाउंडेशनने ही संकल्पना विकसित केली. आता NIN हेच मॉडेल राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे.
स्थापनेपासून WIN ने हेल्थटेक, मेडटेक, बायोटेक्नॉलॉजी आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रांतील 50 हून अधिक उच्च क्षमतेच्या प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. तसेच IIT Bombay, IIT Madras, IIT Delhi, IIT Kanpur, IIT Hyderabad, IIT(ISM) Dhanbad, Indian Institute of Science आणि C-CAMP यांसारख्या प्रमुख संस्थांमध्ये सेंटर्स ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय IIT Kanpur येथे वाधवानी स्कूल ऑफ AI अँड इंटेलिजंट सिस्टिम्स आणि IIT Bombay येथे वाधवानी हेल्थ अँड बायो हब या दोन सुपर हब्सची उभारणीही करण्यात येणार आहे.
NIN या उपक्रमाला अधिक व्यापक सहकार्य मंचाच्या स्वरूपात पुढे नेणार आहे. यामध्ये सरकारी संस्था, परोपकारी संस्था, CSR उपक्रम, कॉर्पोरेट्स आणि इतर संस्थात्मक भागीदार एकत्र येऊन ट्रान्सलेशनल रिसर्च आणि इनोव्हेशनला चालना देऊ शकतील. यासाठी वाधवानी फाउंडेशनने विकसित केलेल्या सामायिक ऑपरेशनल आणि गव्हर्नन्स फ्रेमवर्कचा वापर केला जाईल.
या सहकार्याबद्दल बोलताना वाधवानी फाउंडेशनचे CEO आणि बोर्ड मेंबर डॉ. अजय केला म्हणाले,
“WIN ने हे सिद्ध केले आहे की संशोधक, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदार एका समान ध्येयाने एकत्र आले तर भारताची नवोपक्रम क्षमता अधिक वेगाने उलगडू शकते. NIN च्या माध्यमातून आता देशभरात इनोव्हेशन अधिक लोकाभिमुख करण्याची आणि भारताला जागतिक इनोव्हेशन लीडर म्हणून स्थापित करण्याची मोठी संधी आपल्या समोर आहे. यामुळे अधिक संशोधक, संस्था आणि उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे प्रॉडक्ट्स, स्टार्टअप्स आणि सामाजिक परिणामांमध्ये रूपांतर करण्याची संधी मिळेल. भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन-ड्रिव्हन सोल्यूशन्स पुढे नेण्यासाठी गेट्स फाउंडेशनसोबतचे हे सहकार्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
गेट्स फाउंडेशनच्या इंडिया कंट्री ऑफिसच्या डायरेक्टर सुश्री अर्चना व्यास म्हणाल्या,
“पुढील दशकातील अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य आणि पोषणविषयक नवोपक्रम भारतीय संस्थांमधून समोर येतील. वाधवानी फाउंडेशनसोबतचे हे सहकार्य अशा नवकल्पनांना डिस्कव्हरीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक मजबूत करेल. भारतामधील गेट्स फाउंडेशनच्या कार्याचा मुख्य भाग म्हणजे भारतीय संशोधक आणि उद्योजकांना अशा विज्ञानाधारित उपायांच्या विकासासाठी मदत करणे, जे परवडणारे, मोठ्या प्रमाणावर राबवता येण्यासारखे आणि भारतासह ग्लोबल साऊथसाठीही प्रभावी ठरतील.”
NIN चे उद्दिष्ट पुढील तीन ते पाच वर्षांत देशभरात 250 हून अधिक सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारण्याचे आहे. ही केंद्रे ट्रान्सलेशनल रिसर्च, संशोधक-नेतृत्वाखालील उद्योजकता, व्हेंचर निर्मिती आणि कमर्शियलायझेशनला चालना देतील. या उपक्रमाचा हेतू दरवर्षी हजारो कल्पनांना प्रयोगशाळांमधून बाजारपेठ आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा असून, त्यातून नवोपक्रमाधारित सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेग मिळेल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उपजीविकेच्या संधी निर्माण होतील.


