Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमी अत्यंत आनंदाने एअरटेल प्रायॉरिटी पोस्टपेडचा शुभारंभ आपल्यासह शेयर करत आहे: शाश्वत...

मी अत्यंत आनंदाने एअरटेल प्रायॉरिटी पोस्टपेडचा शुभारंभ आपल्यासह शेयर करत आहे: शाश्वत शर्मा (MD आणि CEO – एअरटेल इंडिया)

आपल्यापैकी अनेकांनी आम्हाला सांगितले आहे की कधीकधी गर्दीच्या जागी, एखाद्या वाहतूक कोंडीमध्ये किंवा एखाद्या समारंभामध्ये एखादा व्हिडिओ कॉल करताना किंवा इमेल डाउनलोड करताना किंवा एक फोटो अपलोड करताना आपल्याला फार अडचणीचा सामना करावा लागतो. हीच ती समस्या आहे जिचे निराकरण करण्यावर आम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच आम्ही एअरटेल प्रायॉरिटी पोस्टपेडची सुरवात केली आहे.

एअरटेल प्रायॉरिटी पोस्टपेड हे आपल्याला अगदी गर्दीच्या ठिकाणीही सातत्यपूर्ण अनुभव प्रदान करण्यासाठी विशेषतः डिझाईन केले गेले आहे. हे आमच्या 5G नेटवर्कचे अद्यतन अपग्रेड, ज्याला स्लायसिंग म्हटले जाते त्यामुळे शक्य झाले आहे.

स्लायसिंग म्हणजे अशी क्षमता आहे जिचा शुभारंभ पाश्चिमात्य जगाच्या अनेक भागांमध्ये केला गेला आहे, आणि मला अत्यंत आनंद होत आहे की आता भारतामध्ये आपल्यासाठी आम्ही ही क्षमता सादर करत आहोत. स्लायसिंग प्रकर्षाने नेटवर्कमध्ये सुधारणा करते, ज्यामुळे आम्हाला आमच्या पोस्टपेड प्रायॉरिटी ग्राहकांसाठी ही अतिरिक्त क्षमता सादर करणे शक्य झाले आहे.

आपण ती कशी प्राप्त करू शकाल?

एअरटेल प्रायॉरिटी पोस्टपेड सुविधा आमच्या सर्व पोस्टपेड प्लान्ससाठी उपलब्ध आहे. आपल्याकडे आधीपासूनच पोस्टपेड प्लान असल्यास, आपल्याला आपोआपच या फायद्याचा आनंद घेता येईल. जर सध्या आपल्याकडे प्रीपेड प्लान असेल तर, आपण एअरटेल ऍपला भेट देऊन; किंवा केवळ आपल्या जवळच्या एअरटेल स्टोअरमध्ये जाऊन आपला सध्याचा प्लान पोस्टपेड प्लानमध्ये अपग्रेड करू शकता.

आपण त्याचा अनुभव कसा घेऊ शकाल?

आपण कोणत्याही 5G SA (स्टँड अलोन) सक्षम केलेल्या स्मार्टफोनवर या प्रायॉरिटी सेवेचा अनुभव घेऊ शकाल. फक्त खात्री करा की आपला हँडसेट अद्यतन सॉफ्टवेअर व्हर्जनचा आहे. जर तो तसा नसेल तर, आपल्याला आपल्या फोनच्या ‘सेटिंग्ज’ सेक्शनमध्ये प्रलंबित असलेली कृती दिसून येईल. आपण एअरटेल प्रायॉरिटी सेवांसाठी आपल्या फोनची सुसज्जता एअरटेल ऍपला भेट देऊनही तपासू शकता.

या विषयाबद्दल आणि अशा कोणत्याही गोष्टीमध्ये सुधारणा करून आम्ही आपल्याला अधिक उत्तम सेवा देऊ शकतो त्याविषयी आपले विचार जाणून घेण्यासाठी मी उत्सु

क आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments