Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबरला पुणे जिल्हा दौरा; BLO व मतदारांशी साधणार...

मतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबरला पुणे जिल्हा दौरा; BLO व मतदारांशी साधणार संवाद*

 

 

पुणे, दि. ७ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली -उगले यांचा पुणे जिल्ह्याचा द्वितीय दौरा शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सुरू होणारा हा दौरा पुरंदर, बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांना भेट देत सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे संपणार आहे.

 

*मतदारांशी प्रत्यक्ष संवादावर भर*

या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीपासून विविध मतदारसंघांतील मतदान केंद्रांपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, BLO व मतदारांशी संवाद साधून मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामकाजाची माहिती घेतली जाणार आहे. मतदार यादीसंदर्भातील अडचणी व तक्रारी असलेल्या नागरिकांना मतदार यादी निरीक्षकांकडे त्या मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

तसेच मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या NGRS पोर्टलवर तसेच १९५० या कॉल सेंटर क्रमांकावर नोंदविता येणार आहेत. नागरिकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments