Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार

पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार

 

 

*पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार आहे. Uber ने ONDC च्या सहकार्याने पुण्यात आपल्या अॅपवर मेट्रो तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे!* यामुळे प्रवाशांना *आता थेट Uber अॅपवरून QR-आधारित मेट्रो तिकीट बुक करता येणार असून तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाही.*

 

*दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईनंतर, *पुणे हे Uber वर मेट्रो तिकीट सेवा सुरू करणारे भारतातील पाचवे शहर ठरले आहे.* Uber च्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत Uber अॅपद्वारे 1 कोटीहून अधिक मेट्रो प्रवास बुक करण्यात आले आहेत.

 

*प्रवासी Uber अॅपवरून UPI च्या माध्यमातून तिकीट बुक करून पुढील प्रवासासाठी Uber Auto, Bike आणि Go सेवा देखील वापरू शकणार आहेत. मर्यादित कालावधीसाठी मेट्रो तिकीट बुकिंगवर 50 टक्के सूट (कमाल ₹10 पर्यंत) देण्यात येत आहे.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments