Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे आवाहन*

शासकीय वसतिगृहाकरिता इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २७ : सामाजिक न्याय विभागामार्फत जुन्नर तालुक्यात अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले शासकीय वसतिगृह सुरू करण्यात येणार असून नारायणगाव व आळेफाटा परिसरात आवश्यक सुविधा असलेली इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

शासकीय अटी व शर्तींनुसार भाडे तत्त्वावर इमारत घेण्यात येणार असून, इमारतीमध्ये किमान २५ ते ३० खोल्या अथवा मोठी इमारत असणे आवश्यक आहे. तसेच स्वतंत्र पुरुष स्त्री विभाग, पुरेसे शौचालय व स्नानगृह, पिण्याचे पाणी व २४ तास पाणीपुरवठा, स्वतंत्र मेस व स्वयंपाक सुविधा, सुरक्षितता व वाहनतळ व्यवस्था असणे अपेक्षित आहे. बसस्थानक किंवा महाविद्यालय परिसरालगत असलेल्या इमारतींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

दीर्घकालीन भाडे करारासाठी इच्छुकांनी अधीक्षक, मुलांचे शासकीय वसतिगृह, चांडोली (ता. खेड, जि. पुणे) यांच्याशी कार्यालयीन वेळेत

९३२५०५४३५८

ई-मेल : chandoliboyshostel@gmail यावर संपर्क साधावा, अशी माहिती गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली, खेड यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments