Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized*राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-९ ची जय्यत तयारी; १.१९ कोटी लस मात्रा उपलब्ध...

*राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-९ ची जय्यत तयारी; १.१९ कोटी लस मात्रा उपलब्ध होणार*

 

 

पुणे, दि. 27 (जिमाका, वृत्तसेवा) : राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार असून, लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

 

लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शीतगृहात सुमारे ३ लाख लस मात्रा साठवण्याची क्षमता आहे. याशिवाय विद्यमान शीतगृहांचाही पूर्ण क्षमतेने वापर करण्यात येणार आहे.

 

आतापर्यंत लाळखुरकत लसीकरणाच्या ८ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून, प्रभावी लसीकरणामुळे राज्यात अलीकडील काळात रोगाचा उद्रेक आढळलेला नाही. सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव न झाल्यास महाराष्ट्राला ‘लाळखुरकत रोगमुक्त’ दर्जा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे दुग्ध, मांस आणि अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते.

 

जिल्हानिहाय लस साठवण क्षमता तपासून माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. तसेच ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विभागाने तयारी सुरू केली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments