तसेच, किफायती वर्गात दीर्घकाळ टिकणाऱ्या मूल्यासाठी उत्पादन कामगिरीच्या महत्त्वाच्या पैलूंवर 4 वर्षांची वॉरंटी दिली जाते.
राष्ट्रीय, मे, 2026: आजच्या घरमालकांना केवळ सुंदरच दिसणारी नाहीत तर आरामदायकही वाटणारी आणि वर्षानुवर्षे टिकणारी घरे आवडतात. परंतु, किफायती पेंट प्रकारांत, दिसण्यास आकर्षक, उत्तम कामगिरी आणि परवडणारी किंमत या तिन्ही गोष्टी एकत्र देणारी उत्पादने शोधणे मात्र अनेकदा कठीण असते. सर्वसामान्य चिंतांपैकी एक म्हणजे भिंतींवरील पाण्याचे डाग, ही एक अशी समस्या आहे जी अन्यथा चांगल्या प्रकारे जोपासलेल्या घराचे सौंदर्य नकळतपणे कमी करू शकते. ही गरज लक्षात घेऊन, एशियन पेंट्सने आपल्या लोकप्रिय एस आणि ट्रॅक्टर इमल्शन्समध्ये अँटी-डॅम्प म्हणजेच आर्द्रता विरोधी तंत्रज्ञान सादर केले आहे. याबरोबरच, ही उत्पादने कामगिरीच्या महत्त्वाच्या पैलूंवर 4 वर्षांची वॉरंटी देतात, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि मूल्य एकाच उत्पादनात जुळून मिळतात.
एशियन पेंट्सचे दोन सर्वात विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ब्रँड्स, एस (Ace) आणि ट्रॅक्टर (Tractor) इमल्शन्स, यांनी किफायती प्रकारात विश्वसनीय दर्जा आणि मूल्य उपलब्ध करून घरमालक, डीलर्स आणि कंत्राटदारांचा विश्वास जिंकला आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये नवनवीन शोध सातत्याने सादर करणे चालू आहे. यामध्ये अधिक चांगले मूल्य देणारी ट्रॅक्टर ॲन्ड एस स्पार्क (ACE Sparc) श्रेणी आणि घरांसाठी एक चमकदार फिनिश देणारी ट्रॅक्टर ॲन्ड एस शाइन (Ace Shine) श्रेणी समाविष्ट आहे.~
आर्द्रता-विरोधी तंत्रज्ञान (Anti-Damp Technology) सादर करत, एशियन पेंट्सने घरमालकांना भेडसावणाऱ्या सर्वात सामान्य आव्हानांपैकी एकावर तोडगा शोधून हा वारसा पुढे नेला आहे. हे नवीन तंत्रज्ञान भिंतींवर पाण्याचे डाग पडण्यापासून रोखण्यास मदत करते, ज्यामुळे एक सहज दिसणारा आणि आश्वासक फायदा मिळतो. या नावीन्यपूर्ण शोधाद्वारे, कंपनीचा उद्देश किफायती पेंट प्रकाराचा वापर करणार्या ग्राहकांना दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि अधिक मनःशांती देणे हा आहे.
ही अंतर्दृष्टी सोप्या आणि त्यांना सहज समजेल अशा पद्धतीने पोहोचवण्यासाठी, ब्रँडने घरमालकांच्या एका सामान्य समस्येवर प्रकाश टाकण्याकरिता विनोदाचा वापर करून एक नवीन मोहीम सुरू केली आहे. प्रख्यात अभिनेते गजराज राव आणि बृजेंद्र कला यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात, एक घरमालक पाहुण्यांचे आदरातिथ्य करत असतो, पण तिथे एका अनपेक्षित उपस्थितीमुळे त्यांच्या कामात वारंवार व्यत्यय येतो – ती म्हणजे पाण्याचा डाग, ज्याला एका खोडकर पात्राच्या रूपात सजीव आहे. घरमालक शांत राहण्याचा प्रयत्न करत असताना, तो पाण्याचा डाग अगदी गैरसोयीच्या क्षणी पुन्हा पुन्हा समोर येतो, ज्यामुळे अनेक विनोदी पण तरीही आपल्याशी जुळणार्या प्रसंगांची मालिका निर्माण होते. दमट भिंती सुकल्यानंतर दिसणाऱ्या पाण्याच्या डागांमुळे होणारा दैनंदिन त्रास या कथानकात छान दाखवला आहे, तसेच आर्द्रता-विरोधी तंत्रज्ञान अशा समस्या टाळण्यास कसे मदत करते, हे देखील अधोरेखित केले आहे.
एशियन पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अमित सिंगले म्हणाले, “संपूर्ण भारतात, ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये आम्हाला एक स्पष्ट बदल दिसून येत आहे, जिथे किंमत काहीही असो, कामगिरी आणि सौंदर्य या दोन्हीं समान महत्त्वाच्या आहेत. एशियन पेंट्समध्ये, आम्ही ग्राहकांच्या या गरजा सतत समजून घेतल्या आहेत आणि संपूर्ण भारतातील अधिकाधिक घरांसाठी नाविन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून देत आहोत. या श्रेणीतील आमच्या उत्पादनांना कामगिरीच्या मुख्य वैशिष्ट्यांवर 4 वर्षांची वॉरंटी दिली जाते, ज्यामुळे ग्राहकांना अधिक विश्वासार्हता आणि दीर्घकाळ टिकणारे मूल्य मिळते. ट्रॅक्टर आणि एस इमल्शन्समध्ये अँटी-डॅम्प टेक्नॉलॉजीचा समावेश ही वचनबद्धता आणखी पुढे नेत किफायतशीर श्रेणीतील घरांना पाण्याच्या डागांशी संबंधित समस्यांपासून विश्वसनीय संरक्षण मिळते आणि प्रत्येक भारतीय घरासाठी अर्थपूर्ण आणि नवनव्या संशोधनांची उपलब्धता वाढते.”
या उत्पादनाच्या लाँचद्वारे, ग्राहक किफायतशीर पेंटकडून काय अपेक्षा करू शकतात हे एशियन पेंट्स पुन्हा एकदा दाखवून देत आहे – ज्यात परवडणारी किंमत, उत्तम कार्यक्षमता आणि नावीन्य यांचा संगम साधला आहे.
ट्रॅक्टर आणि एस इमलशनच्या अँटी-डॅम्प टेक्नॉलॉजीवरील नवीन टीव्हीसी येथे पहा:
• https://youtu.be/jbmadjiLgyg?si=uTi5m37yEHUmSitL
• https://youtu.be/mUKdn-eHfFM?si
=HAoQD6MOus2sn5MT


