Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोळावा पुणे लघुपट  महोत्सव सात जून रोजी

सोळावा पुणे लघुपट  महोत्सव सात जून रोजी

 

पुणे दिनांक 31 (प्रतिनिधी) _ नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञान साठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येणारा पुणे लघुपट महोत्सव यंदा सात जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे यंदा सोळावे वर्ष आहे.

सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील सभागृहामध्ये सात जून रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट या महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार आहेत .हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.

ज्येष्ठ लेखक, संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव आणि प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल मित्तल यांच्या हस्ते महोत्सवातील विविध विभागातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या विविध लघुपटापैकी सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आधी 26 विभागांमध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात येणाऱ्या विविध लघुपटनचे दिग्दर्शक निर्माते आणि तंत्रज्ञ या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत या तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद, चर्चासत्र आदी विविध कार्यक्रमही महोत्सवामध्ये घेण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments