Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमदर्स रेसिपी ने आपल्या प्रसिद्ध लोणच्यासाठी नवी मोहीम सुरू करत भारतीय परंपरांचा...

मदर्स रेसिपी ने आपल्या प्रसिद्ध लोणच्यासाठी नवी मोहीम सुरू करत भारतीय परंपरांचा उत्सव साजरा केला

 

ब्रँडने लोणच्यांच्या नवीन आकर्षक पॅकेजिंग सोबत अशी मोहीम सादर केली आहे, जी आईच्या प्रेमाची चव आणि भारतातील विविध भागांतील लोणचे बनवण्याच्या पारंपरिक पद्धतींचा सन्मान करते.

मुंबई, मे 2026:मदर्स रेसिपीने आपल्या प्रसिद्ध लोणच्यांच्या श्रेणीसाठी देशभरात नवीन मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेसोबत कंपनीने आपल्या लोणच्यांच्या पॅकेजिंग मध्येही नवीन बदल केले आहेत. लोणच्यांची ही श्रेणी सुरू झाल्यानंतर ब्रँडने प्रथमच आपल्या प्रसिद्ध लोणच्यांना नवीन आकर्षक शैलीत सादर केले आहे, यामुळे या उत्पादनांच्या प्रवासाची नवीन सुरुवात झाली आहे.

या मोहिमेचा मुख्य संदेश खूप साधा आहे. भारतातील प्रत्येक घरात आणि प्रत्येक भागात लोणचे बनवण्याची पद्धत वेगळी असली, तरी त्यामागचे आईचे प्रेम आणि जिव्हाळा मात्र सारखाच असतो. या जाहिरातीत आईला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, भारतातील विविध घरांमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने लोणचे कसे तयार केले जाते आणि ते कुटुंबाच्या जेवणाच्या ताटापर्यंत कसे पोहोचते, हा प्रवास यात दाखवला आहे. यामध्ये मदर्स रेसिपी हा ब्रँड प्रेम, घरगुती चव आणि कुटुंबातील आपुलकी यांना जोडणारा समान धागा म्हणून दिसून येतो.

ही मोहीम भारतीय घरांमधील पारंपरिक पद्धतीने लोणचे बनवण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. कच्च्या कैऱ्यांची निवड करण्यापासून ते आईच्या हातांनी आंबे कापणे, वाळवणे, मसाले लावणे आणि काळजीपूर्वक साठवून ठेवणे या सर्व गोष्टी या जाहिरातीत सुंदरपणे दाखवण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांची खास परंपरा आणि चव जपत, प्रत्येक घराला आपलेसे वाटतील असे प्रसंग यात दाखवले आहेत. भारतातील लोणच्यांच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी ही मोहीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये खऱ्या, पारंपरिक आणि सहज ओळखू येणाऱ्या दृश्यांद्वारे ब्रँडला अधिक आपुलकीचा आणि भावनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या जाहिरातीतील संगीत भारतीय पारंपरिक धून आणि लोकसंगीताच्या समृद्धतेपासून प्रेरित आहे. त्यामुळे हे संगीत उबदार, आपलेसे आणि भावनिक वाटते. भारतीय वाद्यसंगीत आणि हलक्या, आनंदी तालांचा सुंदर संगम या गाण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील घरांमध्ये लोणचे बनवताना असलेला आनंद आणि प्रेम याची भावना अधिक चांगल्या प्रकारे दिसून येते. या संगीतामध्ये जुन्या आठवणींचा स्पर्श असून त्यात आधुनिकतेची झलकही आहे, ज्यामुळे ही कथा ताजी आणि आकर्षक वाटते. शेवटी मदर्स रेसिपीची प्रसिद्ध बासरीची धून मनात आपुलकी आणि आठवणींची भावना निर्माण करते.

ही मोहीम मदर्स रेसिपीच्या लोणच्यांच्या ब्रँडला बाजारात नव्या पद्धतीने सादर करण्याची सुरुवातही दर्शवते. ही फक्त उत्पादनाची माहिती देणारी जाहिरात नसून, आठवणी, विविध भागांतील आईंचे प्रेम आणि भारतीय घरांमध्ये आई आणि लोणच्यांना असलेले खास स्थान यांची भावनिक कथा सांगणारी मोहीम आहे. या मोहिमेमुळे ब्रँडला आधुनिक स्वरूप मिळाले असले तरी, अनेक पिढ्यांपासून लोकांच्या मनात असलेला मदर्स रेसिपीवरील विश्वास आणि आपलेपणाही कायम ठेवण्यात आला आहे.

या मोहिमेसोबतच मदर्स रेसिपीने आपल्या लोणच्यांच्या श्रेणीसाठी नवीन ओळख सादर केली आहे. हा बदल या ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही नवीन ओळख आईच्या हाताने तयार केलेल्या लोणच्यांमधील आपुलकी आणि घरगुती चव दाखवते. यामध्ये विविध प्रादेशिक गोष्टींचा खास समावेश करण्यात आला आहे. आईंच्या हातातील पारंपरिक बांगड्या, साड्यांच्या रंगांपासून प्रेरित लेबलचे रंग आणि जुन्या स्वयंपाकघरांची आठवण करून देणारी पितळी भांडी अशा अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. भारतभरातील लोणचे बनवण्याच्या परंपरा आणि घरगुती चव साजरी करण्यासाठी प्रत्येक गोष्ट खास पद्धतीने तयार करण्यात आली आहे. तसेच, ब्रँडने प्रादेशिक नाते अधिक मजबूत करण्यासाठी आता सर्व 64 प्रकारच्या लोणच्यांच्या लेबलवर त्यांची नावे प्रादेशिक भाषांमध्येही दिली आहेत. त्यामुळे हे पॅकेजिंग अधिक आपलेसे, ओळखीचे आणि स्थानिक खाद्य परंपरांशी जोडलेले वाटते.

या नवीन डिझाइनची संकल्पना ‘स्वाद ममता का’, प्रादेशिक परंपरा आणि आधुनिक भारतीय शैली यांच्यापासून प्रेरित आहे. पारंपरिक गोष्टी जपत आधुनिक पद्धतीने तयार केलेले हे पॅकेजिंग प्रदेशांची खास ओळख आणि घरातील स्वयंपाकघरातील परिचित गोष्टी दाखवते. त्यामुळे पॅकेजिंग, स्थान आणि चव यांच्यातील नाते अधिक घट्ट होते.

इंटीग्रेटेड 360-डिग्री मोहिमेबद्दल बोलताना, संजना देसाई, एग्जीक्यूटिव डायरेक्टर, देसाई फूड्स प्रा. लि. यांनी सांगितले, “अनेक पिढ्यांपासून मदर्स रेसिपीचे लोणचे हे अस्सल घरगुती चव, जुन्या आठवणी आणि आईच्या प्रेमाची खास चव यासाठी ओळखले जाते. आमची नवीन ओळख सादर करताना, आम्ही भारतातील वेगवेगळ्या भागांतील लोणचे बनवण्याच्या परंपरांचा उत्सव साजरा करत आहोत, जिथे प्रत्येक आई आपल्या प्रेमाने, काळजीने आणि खास पद्धतीने लोणचे तयार करते. या मोहिमेद्वारे आम्हाला भारतातील अस्सल प्रादेशिक चवींची विविधता दाखवायची होती आणि मदर्स रेसिपीने नेहमी जपलेल्या ‘स्वाद ममता का’ या भावनेला अधिक सुंदरपणे सादर करायचे होते.”

विहार पाटकर, ग्रुप क्रिएटिव्ह डायरेक्टर, 82.5 कम्युनिकेशन्स प्रा. लि. (डब्ल्यूपीपी ग्रुप) यांनी सांगितले, “मदर्स रेसिपीच्या लोणच्यांच्या ब्रँडला भावनिक पातळीवर नव्याने सादर करण्याची ही एक खास संधी होती. भारतातील प्रत्येक घरात लोणचे बनवण्याची पद्धत वेगळी असली, तरी त्यामागचे प्रेम, संयम आणि काळजी सर्वत्र सारखीच असते, या भावनेवर ही मोहीम आधारित आहे. त्यामुळे ही मोहिम जुन्या आठवणींशी जोडलेली वाटते, तर नवीन पॅकेजिंगमुळे ब्रँडला बाजारात अधिक मजबूत आणि आधुनिक ओळख मिळाली.”

ही मोहीम डिजिटल माध्यमे, टेलिव्हिजन, आउटडोअर जाहिराती, दुकाने आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे राबवली जात आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि ईशान्य भारतातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये मोहिम दिसणार आहे. जाहिरात चित्रपट आणि नवीन पॅकेजिंगमुळे सर्व प्लॅटफॉर्मवर ब्रँडची एकसंध आणि मजबूत ओळख तयार करण्यात आली आहे.

मदर्स रेसिपीसाठी ही नवीन मोहीम आणि पॅकेजिंग एकत्र सादर करणे म्हणजे त्यांच्या लोकप्रिय लोणच्यांच्या श्रेणीला अधिक आकर्षक, स्पष्ट आणि आधुनिक स्वरूप देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तरीही, भारतीय स्वयंपाकघरांमध्ये या उत्पादनांशी जोडलेली भावनिक भावना कायम ठेवण्यात आली आहे.

मदर्स रेसिपीची नवीन लोणच्यांची मोहीम आता देशभरात सुरू करण्यात आली असून, उत्पादनांच्या उपलब्धतेनुसार नवीन पॅकेजिंग आणि ब्रँडची ओळख विविध बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने सादर केली जात आहे.

मदर्स रेसिपी बद्दल

मदर्स रेसिपी हा देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचा भारतातील एक विश्वासार्ह खाद्य ब्रँड आहे, जो आपल्या अस्सल चव आणि पारंपरिक रेसिपीसाठी ओळखला जातो. या ब्रँडकडे लोणची, पेस्ट, रेडी-टू-कुक मिक्स, चटण्या आणि पापड यांसारख्या विविध उत्पादनांची मोठी रेंज आहे. मॉडर्न ट्रेड, रिटेल आणि ई-कॉमर्समध्ये मजबूत उपस्थितीसह मदर्स रेसिपी चे प्रॉडक्ट्स 60 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केले जातात. पुणे, कोलकाता आणि भरोडा (गुजरात) येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्रांमध्ये उच्च दर्जाचे गुणवत्ता मानदंड पाळले जातात, ज्यामुळे प्रत्येक उत्पादनात शुद्धता आणि चव यांची खात्री मिळते, ज्यावर अनेक पिढ्यांनी विश्वास ठेवला आहे.

अधिक माहितीसाठी www.mothersrecipe.co

m ला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments