Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाळांच्या दैनंदिन अंघोळीत आता त्वचेच्या विशेष काळजीचा स्पर्श; ‘हिमालया बेबीकेअर’ची नवी संकल्पना 

बाळांच्या दैनंदिन अंघोळीत आता त्वचेच्या विशेष काळजीचा स्पर्श; ‘हिमालया बेबीकेअर’ची नवी संकल्पना 

 

~ नवजात बाळांच्या त्वचेच्या खास गरजा आणि ऋतूनुसार होणाऱ्या त्वचेच्या समस्यांसाठी विशेष साबणांची जोड ~

भारत, 01 June, २०२६ : भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि डॉक्टरांनी सर्वाधिक शिफारस केलेल्या† बेबी केअर ब्रँडपैकी एक असलेल्या ‘हिमालया बेबीकेअर’ने ‘हिमालया जेंटल बेबी सोप’ आणि ‘रिफ्रेशिंग बेबी सोप’ या दोन उत्पादनांसाठी दोन नवीन जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत. “मोअर दॅन क्लीन्सिंग. इट्स केअर.” या संदेशासह बेबी सोपचा हा पोर्टफोलिओ नव्या पद्धतीने कंपनीने सादर केला आहे. कंपनीचे हे महत्त्वाचे धोरण मानले जात आहे. नवजात बाळांच्या त्वचेच्या गरजांची कंपनीला असलेली सखोल जाण लक्षात घेऊन करण्यात आलेला हा बदल आजच्या पालकांच्या बदलत्या अपेक्षांशी सुसंगत असल्याचे दिसून येते. या पालकांना केवळ सुरक्षित उत्पादने नको असतात, तर नवजात बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी दैनंदिन वापरता येतील अशी सौम्य स्वरुपाची काळजी घेणारी, तसेच ऋतू बदलांदरम्यान त्वचेची जपणूक करणारी विशेष उत्पादने हवी असतात.

हिमालया जेंटल बेबी सोप

जाहिरातीची लिंक – https://youtu.be/2pjcheazE1M

‘जेंटल बेबी सोप’वरील ही फिल्म एका शांत आणि भावनिक क्षणातून पुढे सरकते. एक आई आपल्या नवजात बाळाला अंघोळ घालण्याची तयारी करत असते. साधा वाटणारा हा दैनंदिन क्षणही तिच्यासाठी काळजी, जबाबदारी आणि योग्य निवड करण्याच्या चिंतेने भरलेला असतो. बाळाला अलगद हातात घेताना तिच्या मनात एक परिचित प्रश्न उमटतो – “कैसे करूं सही साबुन का सिलेक्शन?” नवजात बाळाच्या त्वचेबाबत अगदी छोट्या निर्णयालाही किती महत्त्व असते, ही भावना या कथानकातून सहजपणे मांडण्यात आली आहे. यानंतर एका शांत आणि दिलासादायक वळणावर बाळाचे वडील हिमालया जेंटल बेबी सोप हा विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे आणतात आणि आईची चिंता कमी होते. हा केवळ समस्येवरील उपाय नसून, अस्वस्थतेतून विश्वासाकडे आणि चिंतेतून दिलाशाकडे होणारा भावनिक प्रवासही आहे.

या जाहिरातीत उत्पादनाच्या खास वैशिष्ट्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हिमालया जेंटल बेबी सोप हा भारतातील अव्वल क्रमांकाचा बेबी सोप* असून नवजात बाळांच्या नाजूक त्वचेसाठी तो खास तयार करण्यात आला आहे. बदाम आणि ऑलिव्ह यांच्या १०० टक्के नैसर्गिक तेलांपासून बनवलेला आणि खास ‘फायटो ऑइल-कॉम्प्लेक्स’ने समृद्ध असलेला हा साबण त्वचेतील ओलावा कायम ठेवतो, तसेच सौम्य स्वरुपाची स्वच्छता करण्यात मदत करतो. तीव्र स्वरुपाच्या रसायनांपासून मुक्त असलेले हे विशिष्ट मिश्रण अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मदत करते आणि बाळाची त्वचा मऊ व निरोगी ठेवण्यास सहाय्य करते.

या सौम्य फॉर्म्युलेशनमध्ये ९७ टक्के नैसर्गिक घटकांचा^ समावेश असून, ते बाळाच्या त्वचेचे कोरडेपणापासून संरक्षण करण्यास आणि प्रत्येक अंघोळीनंतर त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. यातून “मोअर दॅन क्लीन्सिंग. इट्स जेंटल केअर” हा ब्रँडचा संदेश अधिक ठळकपणे मांडण्यात आला असून, केवळ स्वच्छतेपलीकडे जाऊन नवजात बाळाच्या त्वचेसाठी सौम्य आणि प्रभावी काळजी घेण्यावर भर देण्यात आला आहे.

“सिर्फ क्लीन्सिंग नहीं. स्किन की जेंटल केअर भी” या संदेशाद्वारे नवजात बाळाच्या त्वचेची योग्य काळजी घेणारी आणि संरक्षण करणारी विशेष उत्पादने निवडण्याचे महत्त्वही ब्रँडकडून अधोरेखित करण्यात आले आहे.

हिमालया रिफ्रेशिंग बेबी सोप

जाहिरातीची लिंक – https://youtu.be/eFitBcUkJZM

रिफ्रेशिंग बेबी सोपवरील ही फिल्म हलक्या-फुलक्या आणि प्रेमळ कथानकातून पुढे सरकते. आई आणि बाळ यांच्यातील खास क्षण दाखवणाऱ्या या फिल्ममध्ये उन्हाळ्यातील उकाडा, घाम आणि त्वचेची जळजळ या गोष्टी आईच्या मजेशीर आणि अतिशयोक्त भाव-हावभावांमधून दाखवण्यात आल्या आहेत आणि त्याला बाळाच्या निरागस आणि आनंदी प्रतिसादही दाखविण्यात आला आहे. “कितनी गर्मी” आणि “पसीना पसीना” असे संवाद वापरत भारतीय पालकांना परिचित असलेल्या उन्हाळ्यातील त्रासांना विनोदी शैलीत मांडण्यात आले आहे. “सिर्फ क्लीन्सिंग नहीं, स्किन की रिफ्रेशिंग केअर भी” हा संदेश या जाहिरातीच्या केंद्रस्थानी आहे. उन्हाळ्यात बाळाच्या त्वचेची काळजी ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून त्वचेला ताजेतवाने आणि आरामदायी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे ‘हिमालया बेबीकेअर’ने या माध्यमातून व्यक्त केले आहे.

भारतातील उन्हाळा बाळांच्या त्वचेसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. घामामुळे होणारी त्वचेची जळजळ, उष्णतेमुळे येणारी पुरळ आणि अस्वस्थता या समस्या त्यांना अनेकदा जाणवतात. यासाठी ‘हिमालया बेबीकेअर’ने कलिंगड, वाळा आणि कडुनिंबाच्या गुणधर्मांनी समृद्ध ‘अॅक्वाफ्रेश कॉम्प्लेक्स’युक्त रिफ्रेशिंग बेबी सोप सादर केले आहे. हे फॉर्म्युलेशन घाम आणि उष्णतेमुळे होणारी त्वचेची अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. ही दोन्ही उत्पादने बाळांच्या त्वचेच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. नवजात बाळांच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यापासून ते भारतीय हवामानामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्यांपर्यंत विविध गरजांवर त्यांचा भर आहे. या माध्यमातून विशेष बेबी सोप्सचा व्यापक पोर्टफोलिओ विकसित करण्याच्या ‘हिमालया बेबीकेअर’च्या प्रयत्नांना चालना मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या जाहिरातींविषयी अधिक माहिती देताना हिमालया वेलनेस कंपनीच्या बेबीकेअर विभागाचे संचालक चक्रवर्ती एन. व्ही. म्हणाले, “हिमालया बेबीकेअरमध्ये आमचा दृष्टिकोन नेहमीच नवजात बाळांच्या त्वचेविषयीचे योग्य ते आकलन आणि तिच्या विशेष गरजांवर आधारित राहिला आहे. पालकांचाही कल आता केवळ सुरक्षिततेपुरता मर्यादित न राहता, खास गरजांसाठी विकसित केलेल्या उत्पादनांकडे वाढताना दिसत आहे. पालकांच्या या बदलत्या अपेक्षांमुळे आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विशेषीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. नवजात बाळांच्या नाजूक त्वचेच्या गरजा असोत किंवा भारतातील उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या, आमचे उद्दिष्ट एकच आहे — पालकांना विश्वासाने वापरता येतील अशी सौम्य, प्रभावी आणि विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून देणे.”

हे दोन्ही जाहिरातपट (डीव्हीसी) डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार असून, भारतातील युवा पालकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी त्यांची विविध प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरेही सादर केली जाणार आहेत.

* निल्सन मॅटच्या मार्च २०२६मधील आकडेवारीनुसार

† ‘डॉक्टरांनी शिफारस केलेला दावा हा ब्रँडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार

^ प्रक्रियेनंतरही नैसर्गिक स्वरूपातील ५० टक्क्यांहून अधिक गुणधर्म कायम राखणाऱ्या, पाण्यासह निसर्गातून मिळालेल्या घटकांचा समावेश.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments