नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक एकूण ४०% कमी साखर देतात* आणि १० महत्त्वाचे पोषक घटक^ त्यामुळे विश्वासार्ह पोषण ऑन दि गो स्वरूपात उपलब्ध होते
राष्ट्रीय, १ जून २०२६: हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक सादर करण्याची घोषणा केली आहे. त्याद्वारे ब्रँडने वेगाने वाढणाऱ्या रेडी-टू-ड्रिंक (आरटीडी) पोषण क्षेत्रात विस्तार केला आहे. वेगवान जीवनशैली आणि वाढत्या सजग निवडी करणाऱ्या जेन झी ग्राहकांसाठी तयार केलेला नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक हॉर्लिक्सच्या परिचित चवीला थंडगार, रेडी-टू-ड्रिंक मिल्कशेकच्या सोयीसोबत जोडतो. हॉर्लिक्स क्लासिक माल्ट, हॉर्लिक्स चॉकलेट आणि हॉर्लिक्स केसर बदाम या तीन स्वादिष्ट फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेला हा नवीन मिल्कशेक एकूण ४०% कमी साखरेसह* तयार करण्यात आला आहे आणि झिंक, जीवनसत्त्वे व इतर १० प्रमुख पोषक तत्वांनी^ समृद्ध आहे.
या उत्पादनाची किंमत २० रुपये असून जेन झी ग्राहकांना एक किफायतशीर पेय पर्याय देण्यासाठी तयार केले आहे. ते उत्तम चव आणि अधिक सजग पोषण या दोन्ही गोष्टी देते.
जेन झी ग्राहक आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अधिकाधिक जागरूक होत असल्याने आनंद आणि अधिक सजग निवडी यांचा समतोल साधणाऱ्या पेयांकडे कल वाढत आहे. चविष्ट पेये दैनंदिन जीवनाचा भाग बनली असली तरी आजचे ग्राहक बदलत्या जीवनशैली आणि सवयींमध्ये अधिक सहजपणे सामावून घेणारे पर्याय शोधत आहेत. हॉर्लिक्स मिल्कशेकच्या माध्यमातून हा ब्रँड या बदलाला प्रतिसाद देत असून एकूण ४०% कमी साखर* आणि अतिरिक्त पोषक तत्वांसह एक स्वादिष्ट, चवदार मिल्कशेकचा अनुभव प्रवासात सोबत नेण्याच्या सोयीस्कर स्वरूपात देत आहे.
या अनावरणासोबतच “नो गिल्टी ओन्ली प्लेझर” या संकल्पनेवर आधारित एक नवीन एकात्मिक जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजचे जेन झी ग्राहक त्यांच्या दैनंदिन निवडींमध्ये अधिकाधिक संयम बाळगत आहेत, या दूरदृष्टीवर आधारित ही जाहिरात मोहीम तडजोड न करता आनंदाचे क्षण शोधणाऱ्या पिढीचा गौरव करते. हॉर्लिक्स मिल्कशेक ग्राहकांना एका स्वादिष्ट मिल्कशेकच्या समाधानासोबतच अधिक सजग पौष्टिकतेची खात्री देऊन तणाव दूर करतो.
एका नवीन आणि सहज जुळणाऱ्या कथानकाच्या माध्यमातून ही जाहिरात मोहीम हॉर्लिक्स मिल्कशेकला दैनंदिन क्षणांचा सोबती म्हणून सादर करते, मग तो प्रवास असो, कामातील विश्रांती असो, कॉलेजमधील गप्पागोष्टी असोत किंवा संध्याकाळची भूक असो. त्यामुळे ग्राहकांना चवीवर आधारित अनुभवांचा आनंद घेता येतो.
ही जाहिरात मोहीम भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दूरदर्शन, डिजिटल, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर सहयोग, मोठ्या प्रमाणावरील सॅम्पलिंग उपक्रम, आउटडोअर जाहिरात आणि उच्च-परिणामकारक ग्राहक उपक्रमांचा समावेश असलेल्या उत्तम ३६०-अंश राष्ट्रीय विस्ताराद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली गेली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांना विविध माध्यमांवर ‘नो गिल्टी, ओन्ली प्लेझर’ या संकल्पनेचा अनुभव मिळेल. त्यामुळे ब्रँडचे चव, सोय आणि सजग पोषण यांचे मिश्रण प्रत्यक्ष साकार होईल. निवडक बाजारपेठांमध्ये सतत प्रवासात असणाऱ्या ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना उत्पादन वापरून पाहण्यास प्रवृत्त करण्यासाठी मेट्रोमध्ये व्यापक ब्रँडिंग आणि लक्षवेधी आउट-ऑफ-होम (ओओएच) उपक्रमही राबवले जातील.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फूड्स अँड रिफ्रेशमेंट विभागाचे कार्यकारी संचालक, रजनीत कोहली म्हणाले, “रेडी-टू-ड्रिंक (आरटीडी) श्रेणी वेगाने विकसित होत आहे. जेन झी ग्राहक त्यांच्या जीवनशैलीत सहजपणे सामावून जाणाऱ्या स्वरूपांमध्ये सोय, चव आणि अधिक विचारपूर्वक निवडीच्या शोधात आहेत. त्यामुळे या श्रेणीला चालना मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आमच्या क्लासिक, कॅरॅमल आणि बदाम या प्रकारांसह ‘बूस्ट रेडी-टू-ड्रिंक’चा राष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आणि आरटीडी विभागात आमचे स्थान अधिक मजबूत केले. हॉर्लिक्स मिल्कशेकच्या माध्यमातून आम्ही हॉर्लिक्सचे विश्वसनीय पोषणमूल्य चिल्ड आरटीडी क्षेत्रात आणून एकूण आरटीडी श्रेणीत आमचा विस्तार आणखी वाढवत आहोत. हे उत्पादन उत्तम चव, सोय आणि अधिक विचारपूर्वक पोषणमूल्ये यांना एकत्र आणते. ते सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत, सहज उपलब्ध आणि आजच्या पिढीसाठी तयार केलेले आहे. हे उत्पादन भविष्याभिमुख पोषण श्रेणी तयार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित करत असल्याचे हे अनावरण दर्शवते. त्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि वापराच्या सवयींशी दृढपणे जोडल्या जातात.”
या मोहिमेच्या फिल्ममध्ये हॉर्लिक्स मिल्कशेकचे स्वादिष्ट आणि चवदार आकर्षण दाखवले आहे. तसेच त्याच्या पोषणमूल्यांवर प्रकाश टाकला आहे आणि सोयीस्कर स्वरूपात ‘गिल्ट-फ्री प्लेझर’ देण्याच्या ब्रँडच्या संकल्पनेवर भर दिला आहे. जाहिरात येथे पाहता येईल: हॉर्लिक्स मिल्कशेक टीव्हीसी
नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक आता भारतातील सर्व रिटेल आउटलेट्स आणि निवडक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
*नेल्सन मॅट जुलै २४ नुसार आघाडीच्या शीतपेयांविरूद्ध
^एनएफटीनुसार तथ्याची माहिती (आणि घटक नाही)
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबाबत (एचयूएल)
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ही भारतातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपनी असून तिची उत्पादने देशातील दहापैकी नऊ कुटुंबांच्या जीवनाला स्पर्श करतात. एचयूएल दररोज एक चांगले भविष्य घडवण्यासाठी कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या: https://www.hul.co.in/


