Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedरंगांचे भविष्य, आजच अनुभवा: सोनीने संपूर्ण भारतात सादर केले 'BRAVIA 7II' सह...

रंगांचे भविष्य, आजच अनुभवा: सोनीने संपूर्ण भारतात सादर केले ‘BRAVIA 7II’ सह RGB Backlight Master Drive Pro™ तंत्रज्ञानावर चालणारे ‘ट्रू आरजीबी’ टीव्ही

 

 

 

घरच्या घरी अनुभवा थक्क करणारा थिएटरसारखा थरार! सोनीने आणला, पहिला ‘True RGB BRAVIA TV’— ज्यामध्ये आहे स्वतंत्रपणे नियंत्रित होणारे RGB LEDs, नवी अनोखी अँटी-ग्लॅअर आणि रिफ्लेक्शन स्क्रीन आणि प्रगत Gemini AI च्या स्पोर्टसह Google TV!

 

 

नवी दिल्ली, मे २०२६: सोनी इंडियाने नवा ‘BRAVIA 7II’ टीव्ही बाजारपेठेत दाखल केल्याची घोषणा आज केली आहे. घरगुती मनोरंजनाची नवी व्याख्या रचणारे ‘True RGB’ तंत्रज्ञान यामध्ये आहे. अधिक समृद्ध रंग, सखोलता आणि थक्क करून सोडणारा दृश्य अनुभव तुम्ही यामध्ये घेऊ शकाल. निवडक ‘BRAVIA 7II’ मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग आजपासून सुरू होत आहे. सोनीचे प्रगत डिस्प्ले नाविन्य आणि इंटेलिजेंट प्रोसेसिंग तंत्रज्ञान यांची सांगड घालून, ‘BRAVIA 7II’ टीव्ही तुम्हाला देतो चित्रपटगृहासारखी उत्कृष्ट दृश्य गुणवत्ता! हा टीव्ही तुमच्या रोजच्या टीव्ही पाहण्याला एक अद्भुत आणि विलक्षण मनोरंजन अनुभव बनवतो.

 

 

 

BRAVIA 7II चे बलस्थान आहे, ‘True RGB’ तंत्रज्ञान, जे ‘आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो’ (RGB Backlight Master Drive Pro™) द्वारे चालते. हे सोनीचे स्वतःचे मालकीचे बॅकलाइट नियंत्रण तंत्रज्ञान आहे. यामुळे अचूक उत्कृष्ट रंग, अधिक सखोल विरोधाभास आणि कमालीचा जिवंतपणा मिळवण्यासाठी लाल, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे नियंत्रित केले जातात. ‘कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर’ (Cognitive Processor XR™) सोबत याची सांगड घातल्यामुळे, BRAVIA 7II कोणतीही गोष्ट हुबेहूब तशीच दिसते जशी आपण ती नैसर्गिकरित्या पाहतो आणि ऐकतो — ज्यामुळे अधिक सखोलता, समृद्ध रंग आणि जिवंत तपशीलांसह अप्रतिम दृश्ये तयार होतात.

 

 

 

या उत्कृष्ट अनुभवाला बळ देणारी मुख्य तंत्रज्ञाने खालीलप्रमाणे आहेत:

 

आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो (RGB Backlight Master Drive Pro™) – सोनीचे हे प्रगत इंडिविज्युअल आरजीबी बॅकलाइट नियंत्रण तंत्रज्ञान अचूक ‘लोकल डिमिंग’ प्रदान करते; ज्यामुळे अधिक गडद काळा रंग मिळतो, ब्लूमिंग कमी होते आणि थक्क करणारा कॉन्ट्रास्ट मिळतो.

आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स™ आणि ल्युमिनन्स बूस्टर – हे तंत्रज्ञान ‘QD-OLED’ पातळीवरील रंगांची समृद्धता आणि ‘Mini LED’ चा प्रखर ब्राइटनेस एकत्र आणते, जेणेकरून सोनीचे आजवरचे सर्वात समृद्ध रंग आणि उत्कृष्ट चमक अनुभवता येईल.

स्मूथ कलर ग्रेडेशन – अतिशय सूक्ष्म आणि उत्कृष्ट रंगबदलांमुळे हे तंत्रज्ञान गडद आणि प्रकाशमान अशा दोन्ही दृश्यांमधील प्रत्येक बारकावा आणि वाढीव सखोलता समोर आणते.

एक्स-वाईड अँगल प्रो – या तंत्रज्ञानामुळे खोलीतील कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहताना रंगांची अचूकता आणि कॉन्ट्रास्ट एकसमान दिसतो. तुम्ही टीव्ही कुठूनही पाहत असाल तरी चित्रपटगृहासारखा उत्तम अनुभव मिळतो (हे वैशिष्ट्य केवळ निवडक स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध आहे).

५५ इंच (१४० सेंमी) मॉडेलपासून सुरू होणारी ही मालिका पुढे ६५ इंच (१६५ सेंमी), ७५ इंच (१९० सेंमी) आणि ८५ इंच (२१५ सेंमी) या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तसेच, या मालिकेचा कळस असणारे एक अतिशय आकर्षक ९८ इंच (२४८ सेंमी) मॉडेल जून महिन्यात येणे अपेक्षित आहे; जे संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी सोनीचे “सिनेमा इज कमिंग होम” हे स्वप्न प्रत्यक्षात आणेल.

 

 

 

True RGB सह वास्तवातल्यासारखे रंग व सखोलता यांचा अनुभव आणि चित्रपटगृहासारख्या रंगांचा आनंद घ्या

 

सोनीचा नाविन्यपूर्णतेचा वारसा पुढे नेत, ‘BRAVIA 7II’ ने सोनीचे पहिले ‘True RGB LED BRAVIA TV’ तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान थेट उजेड असलेल्या घरांमध्येही अचूक रंग दाखवण्यासाठी स्वतंत्रपणे चालणारे लाल, हिरवे आणि निळे एलईडी वापरते. ‘आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो™’ तंत्रज्ञानावर आधारित ही प्रगत बॅकलाइट नियंत्रण प्रणाली, ब्राइटनेस वाढवण्यासाठी, प्रकाशाचा अनावश्यक थर (ब्लूमिंग) कमी करण्यासाठी, अधिक गडद काळा रंग देण्यासाठी आणि पारंपारिक मिनी एलईडी डिस्प्लेच्या तुलनेत अतिशय शुद्ध रंग तयार करण्यासाठी प्रत्येक एलईडी अत्यंत अचूकतेने नियंत्रित करते.

 

 

‘आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स™’ मुळे हा टीव्ही सोनीचे आजवरचे सर्वात विस्तृत रंगांचे व्हॉल्यूम प्रदान करतो, ज्यामध्ये कमालीच्या अचूकतेसह रंगांचे विस्तृत स्पेक्ट्रम पुन्हा तयार केले जातात; तर ‘स्मूथ कलर ग्रेडेशन’ प्रत्येक दृश्यामध्ये अखंड आणि अतिशय सूक्ष्म रंगबदल शक्य करते. ‘ल्युमिनन्स बूस्टर’ सह ‘आरजीबी ट्रायल्यूमिनोस मॅक्स’ वर आधारित हे तंत्रज्ञान, ‘QD-OLED’ सारखी रंगांची सखोलता आणि ‘मिनी एलईडी’ तंत्रज्ञानाचा ब्राइटनेस यांची सांगड घालते, जेणेकरून सोनीचा आजवरचा सर्वात समृद्ध आणि जिवंत दृश्य अनुभव ग्राहकांना मिळेल. ६५ इंच आणि त्याहून मोठ्या मॉडेल्सवर, ‘एक्स-वाईड अँगल प्रो’ खोलीतील कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहताना रंगांची अचूकता आणि कॉन्ट्रास्ट एकसमान राखते; ज्यामुळे प्रत्येक सीटवरून टीव्ही पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळतो.

 

 

 

दर्जेदार दृश्य गुणवत्तेसाठी ‘Cognitive Processor XR™’ द्वारे समर्थित

 

‘BRAVIA 7II’ च्या मुख्य केंद्रस्थानी सोनीचा ‘कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर™’ आहे, जो माणसांना नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या आणि ऐकू येणाऱ्या पद्धतीनुसारच चित्रांवर प्रक्रिया करतो. यामुळे हा टीव्ही रिअल टाईममध्ये

 

चित्रांची सखोलता, कॉन्ट्रास्ट आणि स्पष्टता वाढवण्यास सक्षम बनतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक नैसर्गिक

आणि थक्क करून सोडणारी दृश्ये <एक्सआर कॉन्ट्रास्ट बूस्टर २०’ अधिक वास्तववादी अनुभवासाठी चित्रातील प्रकाशमान आणि गडद घटकांचा हुशारीने समतोल राखतो; तर ‘एक्सआर क्लिअर इमेज’ स्क्रीनवरील नको असलेला आवाज कमी करते आणि कमी रिझोल्युशनच्या कंटेंटला जवळजवळ ‘4K’ दर्जापर्यंत अपस्केल करते. त्याच वेळी, ‘एक्सआर मोशन क्लॅरिटी™’ एकाच वेळी अनेक फ्रेम्समधील हालचालींचे विश्लेषण करते, जेणेकरून खेळ, चित्रपट आणि गेमप्ले यांसारखी वेगाने चालणारी दृश्ये अगदी गुळगुळीत, चमकदार आणि अस्पष्टतेशिवाय स्पष्ट दिसतील.

 

 

‘Dolby Vision’ आणि ‘Atmos’ द्वारे समर्थित चित्रपटगृहासारख्या HDR दृश्यांचा आणि बहुआयामी सराउंड साउंडचा आनंद घ्या

 

‘Dolby Vision®’, ‘HDR10’, ‘HLG’ आणि ‘IMAX® Enhanced’ च्या सपोर्टसह, ‘BRAVIA 7II’ अधिक समृद्ध रंग, सखोल कॉन्ट्रास्ट, वाढीव ब्राइटनेस आणि निर्मात्यांना अपेक्षित असलेल्या दृश्य गुणवत्तेसह खरोखरच चित्रपटगृहासारखा दृश्य अनुभव प्रदान करते. ‘नेटफ्लिक्स’, ‘प्राइम व्हिडिओ’ आणि ‘सोनी पिक्चर्स कोर’ साठी असलेले ‘स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स’ वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटनुसार निर्मात्यांचे मूळ उद्दिष्ट पडद्यावर अचूकपणे दाखवण्यासाठी पिक्चर सेटिंग्स आपोआप ऑप्टिमाइझ करतात.

 

 

ऑडिओच्या बाबतीत, ६५ इंच (१६५ सेंमी) आणि त्याहून मोठ्या मॉडेल्समध्ये असलेले ‘अकॉस्टिक मल्टी-ऑडिओ+™’ तंत्रज्ञान स्क्रीनवरील हालचालींनुसार आवाजाला अचूक दिशा देते, ज्यामुळे एका वेगळ्या जगात घेऊन जाणारा अनुभव मिळतो; तर ‘साउंड पोझिशनिंग ट्विटर्स’ टीव्हीच्या स्लिम डिझाइनशी कोणतीही तडजोड न करता बास (bass) परफॉर्मन्स आणखी वाढवतात.

 

‘एआय साऊंड सेपरेशन’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले ‘व्हॉईस झूम ३’ हे वैशिष्ट्य बॅकग्राउंडच्या आवाजातही संवादाची स्पष्टता कायम राखते; तर ‘थ्रीडी सराउंड अपस्केलिंग’ सामान्य ऑडिओला एका विस्तृत ५.१.४ चॅनेल व्हर्च्युअल सराउंड अनुभवामध्ये बदलते. ‘Dolby Atmos®’ आणि ‘DTS:X®’ च्या सहाय्याने, प्रेक्षक ओव्हरहेड इफेक्ट्ससह चित्रपटगृहासारख्या बहुआयामी आवाजाचा आनंद घेऊ शकतात, जो प्रत्येक दृश्याला जिवंत करतो.

 

 

 

4K 120Hz आणि इंटेलिजेंट गेमिंग वैशिष्ट्यांसह नेक्स्ट-जनरेशन गेमिंगसाठी डिझाइन केलेले

 

‘BRAVIA 7II’ टीव्ही ‘HDMI 2.1’ च्या माध्यमातून १२० एफपीएसवर ‘4K’ ला सपोर्ट करतो, ज्यामुळे अत्यंत गुळगुळीत आणि वेगाने प्रतिसाद देणारा गेमिंगचा अनुभव मिळतो. ‘ऑटो लो लेटन्सी मोड’ आणि ‘व्हेरिएबल रिफ्रेश रेट’ यांसारखी वैशिष्ट्ये ‘इनपुट लॅग’ कमी करतात आणि स्क्रीन फाटण्याचा त्रास दूर करतात, ज्यामुळे अखंड गेमिंग अनुभवाची खात्री मिळते.

 

 

 

‘गेम मेनू २’ मुळे युजर्स क्रॉसहेअर, ब्लॅक इक्वलायझर आणि मोशन ब्लर रिडक्शन यांसारख्या गेमिंग सेटिंग्समध्ये झटपट प्रवेश करू शकतात आणि त्या आपल्या आवडीनुसार बदलू शकतात. ‘Dolby Vision® Gaming’ हे वैशिष्ट्य अधिक समृद्ध रंग आणि कॉन्ट्रास्टसह दृश्यांची स्पष्टता वाढवते, तर ‘पीएस रिमोट प्ले’ आणि प्लेस्टेशन ५ साठी दिलेली खास वैशिष्ट्ये—ज्यामध्ये ‘ऑटो एचडीआर टोन मॅपिंग’ आणि ‘ऑटो जॉनर पिक्चर मोड’ समाविष्ट आहेत—यामुळे ‘BRAVIA 7II’ हा कन्सोल गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनतो.

 

 

 

‘Google TV’ आणि ‘Gemini’ सह अनुभवा अत्यंत सुलभ मनोरंजन

 

‘Google TV’ द्वारे समर्थित असलेला ‘BRAVIA 7II’ टीव्ही ग्राहकांना ४,००,००० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शो, तसेच हजारो ॲप्स आणि गेम्स पाहण्याची संधी देतो; ज्यामुळे वैयक्तिक आवडीनुसार आणि सोप्या पद्धतीने नवीन कंटेंट शोधण्याचा उत्तम अनुभव मिळतो. ‘हँड्स-फ्री व्हॉईस सर्च’ आणि अंगभूत ‘Google Assistant’ च्या मदतीने, युजर्स केवळ त्यांच्या आवाजाचा (व्हॉइस कमांड्स) वापर करून टीव्ही नियंत्रित करू शकतात, नवीन कंटेंट शोधू शकतात किंवा घरात असलेली सुसंगत स्मार्ट होम डिव्हाइसेस व्यवस्थापित करू शकतात. अधिक सोयीसाठी हा टीव्ही ‘Apple AirPlay 2’, ‘Apple HomeKit’, ‘Google Cast’ ला देखील सपोर्ट करतो आणि ‘Alexa’ सक्षम डिव्हाइसेससोबतही काम करतो.

 

 

 

याव्यतिरिक्त, ‘Google TV’ साठी असणारे ‘Gemini’ हे एआय तंत्रज्ञान ‘ओव्हर-द-एअर’ अपडेटद्वारे समाविष्ट केले जाईल, ज्यामुळे अधिक नैसर्गिक, एआय-समर्थित संवाद आणि अधिक स्मार्ट कंटेंट शिफारसी मिळणे शक्य होईल.

 

 

 

‘सोनी पिक्चर्स कोर’सह घरीच मिळवा स्टुडिओ-दर्जाच्या चित्रपटगृहासारख्या मनोरंजनाचा आनंद

 

‘BRAVIA 7II’ मुळे ग्राहकांना ‘सोनी पिक्चर्स कोर’ च्या माध्यमातून घरीच स्टुडिओ-दर्जाच्या मनोरंजनाचा आनंद घेता येतो, ज्यामध्ये ‘IMAX® Enhanced’ चित्रपटांसह अनेक सुपरहिट चित्रपटांची निवडक लायब्ररी दिली गेली आहे.

 

 

 

‘प्युअर स्ट्रीम’ (Pure Stream™) द्वारे समर्थित असल्याने, युजर्स ८० एमबीपीएसपर्यंतच्या गतीने कंटेंट स्ट्रीम करू शकतात, ज्यामुळे अगदी ‘4K UHD Blu-ray’ च्या तोडीची पिक्चर क्वालिटी मिळते. याशिवाय, ग्राहकांना २४ महिन्यांसाठी सोनी पिक्चर्सच्या निवडक प्रीमियम चित्रपटांमध्ये प्रवेशासह, खास १० मोफत मूव्ही क्रेडिट्स देखील मिळतील.

 

 

 

विचारपूर्वक केलेले डिझाईन, सहजसोपा वापर आणि मजबूत टिकाऊपणा यांचा उत्तम संगम

 

सोनीच्या ‘हार्मोनिक प्रेझेन्स’ संकल्पनेवर आधारित डिझाइन केलेला ‘BRAVIA 7II’ टीव्ही त्याच्या ‘इमर्सिव्ह फ्रेम’ डिझाइनमुळे आधुनिक घरांमध्ये अगदी सहजतेने सामावून जातो. या मालिकेतील ५५ इंच ते ८५ इंच मॉडेल्ससाठी ‘मिराज स्टँड’ देण्यात आला आहे, तर ९८ इंच मॉडेलमध्ये अधिक प्रीमियम ‘टी-शेप स्टँड’ आहे.

 

 

 

हा टीव्ही मजबूत टिकाऊपणासाठी ‘X-Protection PRO’ तंत्रज्ञानासह तयार करण्यात आला आहे; जो विजेचा कडकडाट, व्होल्टेजमधील चढ-उतार, धूळ आणि दमट हवामान यांपासून संरक्षण देतो. ‘Eco Dashboard 2’ आणि ‘RGB बॅकलाइट मास्टर ड्राईव्ह प्रो’ द्वारे केल्या जाणाऱ्या वीज-बचत RGB LED नियंत्रणामुळे, युजर्स त्यांच्या विजेच्या वापराचे निरीक्षण करू शकतात आणि वीज-बचत करणाऱ्या शिफारसींचा लाभ घेऊ शकतात.

 

 

 

दिव्यांग व्यक्तींशी सल्लामसलत करून, त्यांच्या गरजा समजून घेऊन, त्यांना टीव्ही वापरणे सोपे जाईल यादृष्टीने तयार केलेला, परवडण्याजोगा रिमोट (The Inclusive Affordable Remote) यासोबत येतो. या रिमोटमध्ये बटणांची सुलभ रचना, स्पर्श करून ओळखता येणारे वेगळेपण आणि वापरण्यास सोपा जाण्यासाठी बटणांमध्ये स्पष्ट अंतर देण्यात आले आहे.

 

 

 

किंमत आणि उपलब्धता

 

‘BRAVIA 7II’ मालिका संपूर्ण भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), ‘www.ShopatSC.com’ पोर्टल, आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स विक्री केंद्रे आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर २८ मे २०२६ पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. निवडक ‘BRAVIA 7II’ मॉडेल्ससाठी प्री-बुकिंग आजपासून सुरू होत आहे आणि ग्राहक या लिंकद्वारे रजिस्टर शकतात.

 

मॉडेल

 

स्क्रीनचा आकार

 

एमआरपी (भारतीय रुपयांमध्ये)

 

सर्वोत्तम खरेदी (भारतीय रुपयांमध्ये)

 

उपलब्धता

 

BRAVIA 7 II

 

 

 

५५ (१४० सेमी)

 

३,५९,९००

 

२,२१,९९०

 

पूर्व-नोंदणी आजपासून सुरू

 

लिंक (२८ मे २०२६ पासून पुढे)

 

 

 

६५ (१६५ सेमी)

 

४,३९,९००

 

२,७४,९९०

 

७५ (१९० सेमी)

 

 

 

लवकरच येत आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments