Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची गेट वे ऑफ इंडियाला भेट;  रचना...

म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची गेट वे ऑफ इंडियाला भेट;  रचना व ऐतिहासिक महत्त्वाने प्रभावीत

 

 

 

 

मुंबई, दि. 3 : भारत दौऱ्यावर आलेल्या म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचे शिष्टमंडळ, तसेच ताज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते.

 

राष्ट्राध्यक्ष यु मिन आंग ह्लाईंग यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तूरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान राष्ट्रपतींनी या भव्य स्मारकाची बारकाईने पाहणी केली. गेट वे ऑफ इंडियाची वैशिष्ट्ये, बांधकामातील कलात्मकता; तसेच भारताच्या इतिहासातील स्थान याविषयी त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली.

 

गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये जाणून घेताना ह्लाईंग यांनी गेटवे ऑफ इंडियाचे कौतुक केले. त्यांनी यावेळी विविध पैलूंची माहिती उत्सुकतेने समजून घेतली व व्यक्त केला.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments