पुणे, दि. ३: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरिता अश्विन अशोक मुदगल यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेकडून कळविण्यात आली आहे.
श्री. मुदगल यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९२२६३६३००२ आहे. नागरिकांना त्यांना सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भेटता येईल. संपर्क अधिकारी सागर कोतकर (सं.क्र.९९२१७१५१५१) असा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्या अनुषंगाने संपर्क साधण्याचे आवाहन मतदान निरीक्षक यांनी केले आहे.


