Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टेंट निष्प्रभ ठरल्यास लेझर ठरते जीवनदायी: प्रगत कार्डिअॅक उपचारांद्वारे रुग्णांना मिळते आयुष्याची...

स्टेंट निष्प्रभ ठरल्यास लेझर ठरते जीवनदायी: प्रगत कार्डिअॅक उपचारांद्वारे रुग्णांना मिळते आयुष्याची दुसरी संधी

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपीमुळे पारंपरिक हृदय उपचार पुरेसे ठरत नसलेल्या रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळत आहे

 

 

 

पुणे, ४ जून २०२६: भारतात हृदयविकारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी वयात वाढताना दिसत आहे. अभ्यासानुसार, भारतातील कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू हे ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये होतात, तर प्रत्येक चार हृदयविकाराच्या झटक्यांपैकी एक झटका ४० वर्षांखालील व्यक्तींना येतो. महाराष्ट्रातही तरुणांमधील हृदयविकारांचे प्रमाण वाढत असून, ३० वर्षांच्या आसपासच्या पुरुषांमध्ये तसेच ४० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये याची नोंद होत आहे. पुण्यातही किशोरवयीन आणि ३० वर्षांखालील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामागे बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता ताणतणाव आणि इतर जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

 

 

अँजिओप्लास्टी करून घेतलेल्या रुग्णांचे आयुष्य वाढत असताना, अनेक रुग्ण काही वर्षांनंतर पुन्हा ब्लॉकेज, अरुंद झालेले स्टेंट्स आणि गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजसह डॉक्टरांकडे परत येताना दिसत आहेत. अशा रुग्णांसाठी पुन्हा स्टेंट बसवणे, वारंवार हस्तक्षेप करणे किंवा बायपास शस्त्रक्रिया हा पर्याय असू शकतो. अशा परिस्थितीत, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपीमुळे उपचारांचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धत रक्तप्रवाह सुरळीत करण्यास, जलद पुनर्वसनास मदत करण्यास आणि निवडक रुग्णांमध्ये अतिरिक्त स्टेंट किंवा बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास सहाय्य करते.

 

 

 

या उपचारांचा सकारात्मक परिणाम विविध वयोगटांतील रुग्णांमध्ये दिसून येतो. पूर्वी बसवलेल्या स्टेंटमध्ये गंभीर ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या ७६ वर्षीय रुग्णाला बायपास शस्त्रक्रिया टाळता आली आणि तो पुन्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात परतू शकला. एका २१ वर्षीय तरुणाच्या गुंतागुंतीच्या कोरोनरी ब्लॉकेजवर उपचार करताना अतिरिक्त कायमस्वरूपी इम्प्लांट टाळून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला, ज्यामुळे त्याच्या स्वप्नांना आणि भविष्यातील आयुष्याला नवी दिशा मिळाली. तसेच दोनदा हृदयविकाराचा झटका आलेल्या ५६ वर्षीय रुग्णावर पुनरावृत्ती झालेल्या ब्लॉकेजसाठी लेझर-असिस्टेड अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्यामुळे त्याला आणखी एका मोठ्या शस्त्रक्रियेच्या ओझ्याशिवाय पुढील आयुष्य जगता आले. त्यांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यांचा अनुभव एकच होता—आयुष्य, आरोग्य आणि आशेची नवी संधी.

 

 

 

प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपी ही विशेषतः निष्प्रभ ठरलेल्या स्टेंट्स, गुंतागुंतीचे ब्लॉकेज आणि कॅल्सिफाइड धमन्यांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरते. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धत असून बहुतांश रुग्णांना २४ तासांच्या आत डिस्चार्ज दिला जातो.

 

 

 

या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबद्दल बोलताना, डॉ. अभिजित पळशीकर, संचालक – कार्डिओलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, म्हणाले, “अधिकाधिक रुग्ण अँजिओप्लास्टी करून घेत असून त्यांचे आयुष्य वाढत असल्याने, पुन्हा हस्तक्षेपाची गरज भासणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रगत कार्डिअॅक लेझर तंत्रज्ञानामुळे अशा आव्हानात्मक प्रकरणांचे अधिक अचूकपणे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. पूर्वी बसवलेले स्टेंट निष्प्रभ ठरलेल्या रुग्णांमध्ये आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी उपचार करत आहोत आणि अनेकांना बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास मदत करत आहोत.”

 

 

 

डॉ. निलेश सिंग, हॉस्पिटल डायरेक्टर, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना,“अॅडव्हान्स्ड कार्डियाक लेझर तंत्रज्ञानाचा परिचय आणि त्याचा वापर हा रुग्णांसाठी आधुनिक हृदयविकार उपचार अधिक सुलभ करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. या पद्धतीमुळे गुंतागुंतीच्या कोरोनरी आजारांच्या व्यवस्थापनात कमी आक्रमक (मिनिमली इनवेसिव्ह) उपचार पद्धतीचा वापर शक्य झाला आहे. अशा नवोपक्रमांमुळे क्लिनिकल परिणाम आणि रुग्णांचा अनुभव सुधारण्यास मदत होत असून, योग्य रुग्णांमध्ये पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करण्याची गरज कमी करण्यासही हातभार लागत आहे. कालांतराने, विविध क्लिनिकल परिस्थितींतील अनेक रुग्णांच्या उपचारात याचा उपयोग झाला आहे.”

 

 

 

निष्प्रभ ठरलेले स्टेंट्स, पुनरावृत्ती होणारे ब्लॉकेज आणि गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपी हा केवळ एक पर्यायी उपचार नाही, तर त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबाकडे, करिअरकडे आणि दैनंदिन आयुष्याकडे आत्मविश्वासाने परतण्याची नवी आशा देणारा मार्ग आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments