Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदाम बांधकाम, तेलबिया प्रक्रिया युनिट व मिनी ऑईल मिलसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

गोदाम बांधकाम, तेलबिया प्रक्रिया युनिट व मिनी ऑईल मिलसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा): राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात गोदाम बांधकाम, तेलबिया प्रक्रिया युनिट तसेच मिनी ऑईल मिल, एक्सपेलर उभारणीसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

योजनेअंतर्गत २५० मे.टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १४.५० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच १० टन क्षमतेच्या तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपये अनुदान अनुज्ञेय आहे.

 

मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेस सह रु. 4 लाख, युनिट व मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवा रु. 3 लाख, युनिटसाठी पात्र प्रवर्गानुसार युनिट किंमतीच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. इच्छुक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments