Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorized‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स गिफ्ट’तर्फे ‘ग्लोबल इक्विटीज फंड’ एनएफओ सादर

‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स गिफ्ट’तर्फे ‘ग्लोबल इक्विटीज फंड’ एनएफओ सादर

~ जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना ‘गिफ्ट सिटी’च्या आयएफएससी व्यासपीठाद्वारे नवा पर्याय;

किमान गुंतवणूक ५,००० अमेरिकी डॉलर ~

भारत, ४ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या (आयएफएससीए) नियमनाखाली कार्यरत असलेल्या ‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड – गिफ्ट आयएफएससी’ने आज ‘मार्सेलस ग्लोबल इक्विटीज फंड’ सुरू केला आहे. भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा रिटेल फंड सादर करण्यात आला आहे. या फंडाची ‘न्यू फंड ऑफर’ (एनएफओ) ८ जून २०२६ रोजी खुली होणार असून १९ जून २०२६ रोजी बंद होणार आहे.

आज भारतीय गुंतवणूकदारांचे उत्पन्न रुपयांत असले, तरी परदेशी शिक्षण, जागतिक प्रवास, तंत्रज्ञान आणि लक्झरी वस्तू यांसारख्या त्यांच्या अनेक गरजा व आकांक्षा डॉलरशी जोडलेल्या आहेत. मात्र, बहुतांश भारतीयांच्या गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ अजूनही देशांतर्गत गुंतवणुकीपुरतेच मर्यादित आहेत. जगातील सर्वांत मोठ्या आणि स्थिर इक्विटी बाजारपेठांमध्ये त्यांचा सहभाग अत्यल्प आहे. मार्सेलस ग्लोबल इक्विटीज फंड हा भारतीय रहिवाशांना व कंपन्यांना स्वतंत्रपणे परदेशात पैसे पाठविण्याची गरज न पडता नियामक चौकटीत राहून डॉलर-आधारित संपत्ती निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

हा फंड जागतिक स्तरावरील दर्जेदार आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. संरक्षण व एअरोस्पेस, वीज निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित भांडवली गुंतवणूक आणि लक्झरी उपभोग या बहुअब्ज डॉलर्सच्या चार महत्त्वाच्या क्षेत्रांवर त्याचा विशेष भर राहणार आहे.

‘आयएफएससीए’च्या नियमांनुसार हा फंड ‘रिटेल स्कीम’ म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. या फंडामध्ये किमान ५,००० अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करता येणार असून, त्यानंतर २,००० अमेरिकी डॉलरच्या टॉप-अपची सुविधाही उपलब्ध आहे. या फंडाचा वार्षिक एकूण खर्च गुणोत्तर (टोटल एक्सपेन्स रेशो) २ टक्के आहे. गुंतवणूक केल्यानंतर २४ महिन्यांपूर्वी पैसे काढल्यास २ टक्के एक्झिट लोड आकारला जाणार आहे. मात्र, या फंडासाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही. फंडाचा एनएव्ही दररोज जाहीर केला जाणार आहे. कर भरण्याची जबाबदारी फंड स्तरावर पार पाडली जाणार असल्याने गुंतवणूकदारांना स्वतंत्र कर अनुपालनाची गरज भासणार नाही. दोन वर्षांनंतरच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर लागू होईल, तर दोन वर्षांपूर्वीच्या अल्पकालीन नफ्यावर फंडाच्या लागू कर दरानुसार कर आकारला जाईल. या फंडामध्ये परकीय चलनात गुंतवणूक परत मिळवण्याची सुविधाही आहे. गुंतवणूक प्रक्रियेचे संपूर्ण ऑनबोर्डिंग डिजिटल पद्धतीने होणार असून, त्यासाठी केवळ पॅन आणि आधारची माहिती आवश्यक असेल. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांना गिफ्ट सिटीमध्ये स्वतंत्र बँक खाते उघडण्याची गरज भासणार नाही.

‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’चे संस्थापक सौरभ मुखर्जी म्हणाले, “बहुतांश भारतीय गुंतवणूकदारांनी आपली संपत्ती रुपयांमध्ये उभी केलेली आहे. मात्र परदेशी शिक्षण, जागतिक प्रवास, लक्झरी वस्तू आणि तंत्रज्ञान यांसारख्या त्यांच्या अनेक आकांक्षा डॉलरशी निगडित आहेत. मार्सेलस ग्लोबल इक्विटीज फंड हा या मूलभूत विसंगतीवर आमचा उपाय आहे. गुणवत्ता आणि शिस्त यांवर आधारित मार्सेलसचे गुंतवणुकीचे धोरण आता आम्ही जागतिक स्तरावरही नेत आहोत. साधी, पारदर्शक आणि करदृष्ट्या कार्यक्षम रचना उपलब्ध करून हा गुंतवणूक पर्याय प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराला देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मार्सेलस समूहाच्या ग्लोबल इक्विटीज विभागाचे प्रमुख अरिंदम मंडल म्हणाले, “सध्या जागतिक इक्विटी बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील वाढता खर्च, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊर्जा व डेटा पायाभूत सुविधांमध्ये वाढणारी गुंतवणूक आणि जागतिक स्तरावरील प्रस्थापित लक्झरी ब्रँड्सची मजबूत बाजारपेठीय ताकद अशा अनेक दीर्घकालीन वाढीच्या संधी सध्या समोर आहेत. अमेरिकेतील आमच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे विविध आर्थिक चक्रांमध्ये सातत्याने भांडवलवाढ घडवून आणण्याची क्षमता असलेल्या कंपन्या ओळखण्यास आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यास आम्हाला विशेष मदत मिळते. हा फंड तीच संधी थेट भारतीय गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणार आहे.”

जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात, हे गेल्या अनेक वर्षांतील आकडेवारीतून दिसून आले आहे. केवळ अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये गुंतवणूक केल्याने मागील १०, २० आणि ३० वर्षांच्या कालावधीत सातत्याने दोन अंकी परतावा मिळालेला आहे. तसेच, अमेरिकन आणि भारतीय इक्विटीमध्ये समान प्रमाणात (५०:५०) केलेल्या आणि दरवर्षी संतुलित करण्यात आलेल्या गुंतवणुकीने ऐतिहासिकदृष्ट्या स्वतंत्रपणे कोणत्याही एका बाजारपेठेत केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा दिला आहे. त्यामधील जोखीमही सुमारे ३२ टक्क्यांनी कमी राहिली आहे. याच गुंतवणूक तत्त्वावर आणि पोर्टफोलिओ रचनेच्या विचारावर हा फंड आधारित असल्याचे कंपनीने म्ह

टले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments