Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोल्ट्री उद्योगाने उत्पादनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला*

पोल्ट्री उद्योगाने उत्पादनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला*

*पोल्ट्री उद्योगाने उत्पादनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच पोल्ट्री उद्योगातील प्रमुख संस्था — Compound Livestock Feed Manufacturers Association of India (CLFMA), Karnataka Poultry Farmers and Breeders Association (KPFBA), Indian Poultry Equipment Manufacturers Association (IPEMA), तेलंगणा पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन, ब्रॉयलर कोऑर्डिनेशन कमिटी (तामिळनाडू) तसेच इतर अनेक पोल्ट्री संघटनांची बैठक All India Poultry Breeders Association चे अध्यक्ष बहादूर अली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत गेल्या एका महिन्यात सोयाबीन मीलच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे पोल्ट्री उद्योगासमोर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि खालील निर्णय घेण्यात आला.

फीडच्या खर्चात झालेली मोठी वाढ तसेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये येणारे श्रावण, नवरात्रोत्सव आणि दुर्गापूजा यांसारखे सण लक्षात घेता, या काळात पारंपरिकरित्या चिकनच्या खपात सुमारे २० ते २५ टक्के घट होते. त्यामुळे उद्योगाने तात्काळ प्रभावाने पोल्ट्री उत्पादनात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुधारात्मक उपाययोजनेअंतर्गत देशभरात पॅरेंट ब्रीडर स्टॉकचे कूलिंग (नियंत्रित प्रमाणात कमी करणे) सुरू करण्यात आले आहे.

ब्रीडरच्या विक्रीचा दर पूर्वी सुमारे १४० रुपये होता, तो साठा कमी करण्याच्या उद्देशाने आता सुमारे ६५ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला असून त्या दराने विक्री केली जात आहे.

भारताच्या गरजेपेक्षा सोयाबीनचे उत्पादन अधिक असतानाही साठेबाजीमुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत. NAFED कडील सोयाबीन साठ्याच्या विक्रीदरम्यान काही साठेबाज आणि ४ ते ६ मोठ्या स्टॉकिस्टांनी सट्टेबाजीच्या माध्यमातून दर कृत्रिमरीत्या वाढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे तक्रारही करण्यात येणार आहे.

पोल्ट्री उद्योगाशी संबंधित संस्था सातत्याने सरकारकडे जीएम (Genetically Modified) सोयाबीन मीलच्या आयातीला परवानगी देण्याची मागणी करत आहेत. जीएम सोयाबीन मीलच्या आयातीस परवानगी दिल्यास फीडच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होईल, अशी उद्योगाची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments