Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने पुण्‍यामध्‍ये दोन नवीन स्‍टोअरच्‍या उद्घाटनासह आपली उपस्थिती...

आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने पुण्‍यामध्‍ये दोन नवीन स्‍टोअरच्‍या उद्घाटनासह आपली उपस्थिती वाढवली

पुणे, ५ मे २०२६: आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने हडपसरमधील अमानोरा मॉल आणि वाकडमधील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे दोन नवीन स्टोअर्स सुरू करून पुण्यातील आपला विस्तार अधिक वाढवला आहे. या नवीन स्टोअर्ससह, इंद्रियाची पुण्यातील एकूण स्टोअर्सची संख्या आता ६ झाली आहे, ज्यामुळे इंद्रियाच्या महाराष्ट्र विस्तार प्रवासात पुण्याचे धोरणात्मक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

 

अधिक वैयक्तिकृत आणि अनुभव-आधारित खरेदीची इच्छा ठेवणाऱ्या ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता इंद्रियाच्या महाराष्ट्रातील विस्तारासाठी पुणे अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहरातील दोन प्रमुख रिटेल आणि लाइफस्टाइल ठिकाणांवर सुरू करण्यात आलेले हे नवीन स्टोअर्स ग्राहकांना आपुलकीचा, मंत्रमुग्ध करणारा आणि नवनवीन गोष्टी शोधण्याचा खरेदीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, जे ग्राहकांच्या सणासुदीच्या आणि दैनंदिन फॅशनच्या गरजा पूर्ण करतील. या स्टोअर्समध्ये ३२,००० हून अधिक उत्कृष्ट डिझाइन्सचा विस्तृत पोर्टफोलिओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये वधूचे (ब्राइडल), सणासुदीचे, समकालीन आणि रोजच्या वापरासाठीचे हलक्या वजनाचे दागिने समाविष्ट आहेत. ग्राहकांना आगळावेगळा अनुभव देण्यासाठी स्टोअर्समध्ये खास कारीगरी रूम्स आणि ब्राइडल लाउंज तयार करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना प्रत्येक कलेक्शनमागील कारागिरी, त्यांच्या कथा आणि डिझाइन तत्त्वज्ञान अधिक जवळून अनुभवता येईल आणि त्यांचा खरेदीचा प्रवास अधिक दर्जेदार व वैयक्तिकृत बनेल.

 

या नवीन स्टोअर्सच्या लाँचसह, इंद्रिया पश्चिम भारतात आपली उपस्थिती अधिक दृढ करत आहे. आपला दागिन्यांचा विस्तृत पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण इन-स्टोअर अनुभव शहरातील ग्राहकांच्या अधिक जवळ नेणे, हा यामागील उद्देश आहे.

 

याप्रसंगी आपले मत व्‍यक्त करत इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “पुणे इंद्रियासाठी महत्त्वपूर्ण विकासात्‍मक बाजारपेठ आहे. येथील ग्राहक वर्ग वाढत्या प्रमाणात डिझाइन-जागरूक आणि अनुभवाभिमुख आहेत, तसेच दागिन्यांच्या माध्यमातून आपली वैयक्तिक शैली आत्मविश्वासाने व्यक्त करण्यावर त्यांचा भर आहे. हडपसर आणि वाकड यांसारख्या प्रमुख भागांमधील आमचा विस्तार हा उदयोन्‍मुख बाजारपेठांशी जवळीक निर्माण करण्याच्या आणि इंद्रियाचा डिझाइन-आधारित अनुभव संपूर्ण शहरात अधिक सुलभ करण्याच्या धोरणाचा भाग आहे. या लाँचमधून महाराष्ट्राप्रती आमची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते, जी ब्रँडसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.”

 

इंद्रिया भारतभरात आपला विस्तार करत आहे, त्यामध्ये पुण्याला ब्रँडच्या दृष्टीकोनातून विशेष स्थान आहे. विचारपूर्वक डिझाइन केलेली ठिकाणे, समकालीन कारागिरी आणि उच्च दर्जाचा अनुभव यांच्या माध्यमातून ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे. हे नवीन लाँच प्रत्येक खरेदीमध्ये डिझाइन, भावना आणि स्वतंत्र ओळख शोधणाऱ्या भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी इंद्रियाला पसंतीचे ठिकाण बनवण्याप्रती ब्रँडच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते

.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments