Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन*

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन*

 

 

पुणे, दि. ५: पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार दिनांक ८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथे आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कळविले आहे.

 

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही श्री. सरदेशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments