Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनलिनी कुलकर्णी, दिप्ती चंद्रचूड यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार* याज्ञवल्क्य उद्योजक...

नलिनी कुलकर्णी, दिप्ती चंद्रचूड यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार* याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे आयोजन; विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, डॉ. सुप्रिया पुराणिक, खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

*

पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२४ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यांतर्गत वितरित होणारा स्वयंसिद्धा पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रिज च्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंटस् अँण्ड कोटींग्ज प्रा.लि. च्या संचालिका दिप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह श्रीकांत जोशी, युवा कार्यकारिणी सदस्य प्रतिभा संगमनेरकर, भालचंद्र कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी , अंजली दारव्हेकर, मंजुषा वैद्य, कार्तिकी जोशी, मंदार महाजन, उपेंद्र केळकर, हर्षल लेले आदी उपस्थित होते.

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात शनिवार, दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर याचे शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर असणार आहेत. तर, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. युवा उपक्रमांतर्गत कै. सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत उद्योजिका पुरस्कार अपूर्वा कुलकर्णी, ईशा देशपांडे, ज्योत्स्ना आपटे, स्मृती कुकडे यांना देखील प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments