पुणे, 18 मार्च: जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन आणि ॲक्सेस फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ज्ञानगंगोत्री रेसिडेंशीयल स्कूल मध्ये सुगम्य किस्सा पिटारा या अनोख्या ॲक्सेसिबल लर्निंग बॉक्सचे अनावरण करण्यात आले. समाधान केंद्रात जानेवारीत दिल्लीमध्ये संसाधन केंद्र सुरू केल्यानंतर, दुसरे फेब्रुवारीमध्ये जयपूरच्या उमंग स्कूलमध्ये आणि तिसरे बडोद्याच्या अर्पण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सुरू केले असून असा हा फाऊंडेशनचा चौथा प्रयत्न आहे.
पिटारा वाचन सर्वसमावेशी बनवते आणि त्यासोबत ते फक्त शिकण्याचे एक साधन नव्हे तर एक कायापालट करणारा अनुभव देते. यात वैविध्यपूर्ण साधने आहेत जसे की मोठा फॉन्ट, संवेदी, शांत आणि वर्तनवादी पुस्तके, तसेच स्पर्शगुणी उपकरणे आहेत जी विशेष गरजांसाठी तयार करण्यात आलेली आहेत. म्हणून या उपक्रमातून दृष्टीहीन मुलांच्या व शिकण्यास असमर्थ असलेल्या मुलांच्या असाधारण गरजा पूर्ण केल्या जातात. सुगम्य किस्सा पिटारा सार्वत्रिक डिझाइन तत्त्वांसह तयार केला जातो आणि प्रत्येक पिटारा लवचिक, सुरक्षित आणि वापरण्यास सोपा असून त्यात चैतन्याने भरलेले, कलाकाराने बनविलेले फर्निचर असते. हे शिक्षणाच्या वातावरणात सर्वसमावेशी स्पर्श जोडते.
या उपक्रमाविषयी बोलताना मनीष तायल, संचालक, जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन म्हणाले,
“विशेष गरजा असलेल्यांसाठी सुलभ संसाधन केंद्र हे पहिल्यांदाच केले जात आहे म्हणून नव्हे, तर असा प्रकल्प लोकांच्या जीवनावर करणाऱ्या परिणामामुळे जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन येथे आमच्यासाठी हा एक महत्वपूर्ण टप्पा बनला आहे. या प्रकल्पाचा उद्देश मुलांसह पालक, प्राथमिक काळजीवाहक आणि शिक्षक यांचे सुद्धा जीवन सोपे करणे असा आहे. आम्ही पहिल्या वर्षी दिल्ली, जयपूर, बडोदा आणि आता पुण्यात हा प्रकल्प राबविला असून भविष्यात आणखी ठिकाणी हा प्रकल्प पुढे नेण्याची आशा करतो.”
वर्गाच्या पलीकडे जाऊन सुगम्य किस्सा पिटारा नवीन पुस्तके, क्रियाकलाप शीट्स आणि समावेशी शिक्षण तज्ञांद्वारे विशेष प्रशिक्षण देऊन पालक आणि काळजीवाहक यांना पाठबळ देत आहे. हिंदी आणि इंग्रजीत विशेषतः तयार केलेले काळजीवाहूंसाठी मॅन्युअल घरी प्रभावी शिक्षण वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी अमूल्य अंतर्दृष्टी आणि आधार प्रदान करतात.
युनेस्कोनुसार भारतात 78 लाखांहून अधिक अपंग मुले 5 ते 19 वयोगटातील आहेत. त्यापैकी 61% विद्यार्थी शिक्षण संस्थेत शिकत होते, तर 12% विद्यार्थ्यांनी शाळा सोडली होती आणि 27% विद्यार्थी कधीच शाळेत गेले नव्हते. सर्वसमावेशकता आणि सुलभ शिक्षणाची तातडीची गरज ओळखली गेली आणि देशभरातील विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शिक्षणाचा आनंद आणि सुलभता आणणे हा या उपक्रमाचा उद्देश बनला. प्रत्येक मुलास सशक्त करण्याचा सामान्य दृष्टीकोन असल्याने दरी भरून काढण्याचा आणि अधिक सर्वसमावेशी वाचन भूदृश्य (लँडस्केप) तयार करण्याचा प्रयत्न या अभिनव शिक्षण उपायात केला जात आहे.
जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन बद्दल
जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन ही एक गैरनफा कंपनी आहे जिची नोंदणी भारतीय कंपनी कायद्याच्या कलम 8 अन्वये करण्यात आलेली आहे. 2018 मध्ये, जे.सी.बी इंडियाने जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशनची स्थापना केली, जिने भारतातील साहित्य कलेचा प्रसार करण्याचा उद्देश ठेवला आहे. मातीकाम (अर्थमूव्हिंग) आणि बांधकाम उपकरणे निर्माण करणारी आघाडीची जागतिक कंपनी 1979 पासून भारतात सक्रिय आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनातील या भरीव आणि दीर्घकालीन सहभागावर आधारित जे.सी.बी ने भारतात शाश्वत सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याची इच्छा बाळगली आहे.
ॲक्सेस फॉर ऑल बद्दल
ॲक्सेस फॉर ऑलचे उद्दीष्ट शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रवेशाच्या सीमा ओलांडणे आहे आणि सर्वसमावेशी अनुभवात्मक संस्कृतीला चालना देत अभिनव, स्वदेशी डिझाइन आणि प्रचाराच्या माध्यमातून ते करायचे आहे. ही टीम प्रवेशाचे लेखापरीक्षण (ॲक्सेस ऑडिट), अर्थबोधन (इंटरप्रिटेशन) आणि शैक्षणिक उपक्रम, सर्वसमावेशी प्रचार (आउटरीच) कार्यक्रम, संवेदीकरण आणि जागरूकता कार्यक्रम, ब्रेल-स्पर्श किट, ब्रेल पुस्तके आणि सी.एस.आर वर आधारित संलग्नता कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते.
ज्ञानगंगोत्री रेसिडेंशीयल स्कूल बद्दल
ज्ञानगंगोत्री शाळा 2004 साली सुरू करण्यात आली होती आणि ही एक मोफत निवासी संस्था आहे जी पुणे, महाराष्ट्र, भारत जवळील ग्रामीण भागातील 6 ते 18 वयोगटातील मतिमंद मुलांना शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. धायरी गावाजवळ असलेल्या या संस्थेत सध्या 50 विद्यार्थ्यांना सेवा दिली जात असून, दुर्गम भागातील बौद्धिक असमर्थता असलेल्या फक्त आई किंवा फक्त वडील असलेल्या मुलांना सर्वसमावेशी शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांची संस्था कॉमन ट्रस्ट अॅक्ट 1950 चे पालन करून दिनांक 15 मार्च 2005 रोजी नोंदणी क्रमांक 19938/पुणे अंतर्गत कार्यरत आहे. ट्रस्टचे त्यांचे ध्येय विद्यार्थ्यांना आर्थिक मर्यादांची पर्वा न करता ज्ञान आणि कौशल्ये देऊन सक्षम करणे आहे आणि व्यक्ती व समुदाय दोघांच्याही उज्ज्वल भविष्यास चालना देत आहे.


